Home पिंपरी चिंचवड वाकडमधील हॉटेलमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल

वाकडमधील हॉटेलमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी उपअग्निशमन केंद्रामार्फत वाकड परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १६) मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपत्कालीन परिस्थिती व अग्निदुर्घटनेच्या प्रसंगी नागरिकांची व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका कशी करावी याबाबत मार्गदर्शनासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

 सदर मॉक ड्रिल सहाय्यक आयुक्त (अग्नि) उमेश ढाकणे आणि उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्या आदेशानुसारप्रभारी उपअग्निशमन अधिकारी विजय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मॉक ड्रिल मध्ये अग्निशमन विभागातील अधिकारीस्थायी कर्मचारीशिकाऊ जवान,सहभागी झाले हिते. तसेच यावेळी हॉटेल व्यवस्थापन प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या मॉक ड्रिलमध्ये आग लागल्यास धुरामुळे होणारा गुदमरण्याचा धोकालिफ्टचा वापर टाळणेजिन्यांचा वापर करून बाहेर पडणेहॉटेल व्यवस्थापनाने अग्निशमन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करणेतसेच अग्निशमन विभागाशी त्वरेने संपर्क साधणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून अग्निशामक सिलिंडरचा वापर कसा करावाधुरातून सुरक्षितपणे बाहेर कसे पडावेतसेच बचाव कार्य करताना कोणती काळजी घ्यावी हे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले.

अग्निदुर्घटनेची वेळ सांगून येत नाही. अशा वेळी योग्य निर्णय आणि तत्पर कृती जीवन वाचवू शकते. म्हणूनच मॉक ड्रिलद्वारे नागरिकांना व संस्थांना प्रत्यक्ष सराव करून सज्ज करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पिंपरी चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात उंच इमारतीव्यावसायिक प्रकल्प आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. आमच्या विभागाकडून अशा प्रकारच्या सरावाचे आयोजन सातत्याने करण्यात येईल. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव वाढेल आणि आपत्तीला सामोरे जाताना घाबरून न जाता योग्य कृती करण्याची सवय लागेल.

उमेश ढाकणेसहाय्यक आयुक्त (अग्नि)पिंपरी चिंचवड महानगरपालिका

हॉटेलमध्ये हजारो नागरिक व कर्मचारी दररोज ये-जा करतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची योग्य तयारी व आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सुटका करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या मॉक ड्रिलमुळे हॉटेल कर्मचार्‍यांचा आत्मविश्वास दृढ झाला आहे. आमचे उद्दिष्ट फक्त प्रात्यक्षिक दाखवणे नाहीतर प्रत्यक्ष परिस्थितीत कर्मचारी घाबरून न जाता त्वरित निर्णय घेऊ शकतील याची खात्री करणे आहे. हॉटेल व्यवस्थापनाने देखील सतत प्रशिक्षण व उपकरणांची तपासणी करणे आवश्यक आहे. अशा सरावांमुळे प्रशासनहॉटेल व्यवस्थापन व नागरिक यांच्यात समन्वय अधिक मजबूत होतो.

 विजय घुगेप्रभारी उपअग्निशमन अधिकारीअग्निशमन विभाग

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00