5
पिंपरी
चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन गुरूवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. तरी या बैठकीस विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Please follow and like us:
