Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – महापौर रवि लांडगे

महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा करण्यात आला सन्मान; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, शहराची क्रीडा परंपरा अधिक मजबूत करण्याचे काम करत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, आगामी काळात शहरातील अधिकाधिक युवक-युवतींनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरातील युवा खेळाडूंनी जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली परंपरेत आणखी भर घातली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदके पटकावली. या खेळाडूंचा सन्मान महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी नगरसदस्य सुरेश भोईर, सदाशिव खाडे, प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, या स्पर्धेमध्ये मधुरा खांबे हिने लांब उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. समृद्धी भोईर हिने हेप्टॅथलॉन या कठीण आणि बहुप्रकारांच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली, तर प्राची अंधारे हिने २० हजार मीटर रेस वॉकिंग स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळविले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. खेळाडूंनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल त्यांचा सन्मान करून त्यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00