70
भोसरी
विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड करांनी महायुतीला भरभरून दिले आहे. परंतु गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडकर महेशदादा लांडगे मंत्री व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करत आहेत ही अपेक्षा आता पूर्ण झाली पाहिजे असे मत पिंपरी चिंचवड परिसरात व्यक्त होऊ लागले आहे.
काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेशदादा लांडगे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर शेठ जगताप आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे यांना पिंपरी चिंचवड करांनी भरभरून मते देऊन विजयी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहर गेले अनेक वर्षे मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहे. महेश दादा लांडगे हे मंत्री होणार ही खूप वर्षांची पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे.
गेल्या वेळेस महेश दादा मंत्रिमंडळात असतील अशी अपेक्षा होती ऐनवेळी अजितदादा पवार महायुतीत सामील झाल्यामुळे थोडक्यासाठी महेश दादांचा शपथविधी राहून गेला होता.
यावेळी आता पिंपरी चिंचवड मधील मतदारांनी कोणताही दबाव अथवा अमिषाला बळी न पडता महायुतीला प्रचंड मतदान करत तीनही उमेदवारांना न भूतो न भविष्यती अशा मताधिक्याने विजयी केले आहे.
यावेळी मात्र महेश दादा लांडगे हे मंत्रिमंडळात असावेत अशी पिंपरी चिंचवड मधील तमाम नागरिकांची इच्छा आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत प्रामुख्याने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, पाणी प्रश्न, भोसरी व्हिजनच्या माध्यमातून महेश दादा लांडगे यांनी जाहीर केलेली विविध प्रकल्प, तळवडे रुपीनगर परिसरातील रेड झोनचा प्रश्न, अर्बन स्ट्रीट प्रोजेक्ट या सर्व प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी महेश दादांचे मंत्रिपद खूप महत्त्वाचे आहे या शहराच्या भक्कम आणि सुनियोजित विकासासाठी महेश दादांना मंत्री पद दिले जावे असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
|
ReplyForward |
Please follow and like us:
