60
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांनी अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवतील, अशी भविष्यवाणी केली आहे. नरेश अरोरा हे गेल्या पाच महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यासोबत काम करत आहेत आणि राजकीय रणनिती आखण्यात आणि तळागळातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
अजित पवार आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभर फिरून या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेले सर्व विधानसभा मतदारसंघ कव्हर करून जन सन्मान यात्रेचे नियोजन आणि आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी चांगलं वातावरण असल्याचं सर्वेक्षणातून दिसून येत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत नरेश अरोरा म्हणाले; # MaharashtraAssemblyElection202 4 साठी मी एक भविष्यवाणी करत आहे. या निवडणुकीत अजित पवार बारामतीतून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि या विजयाची इतिहासात नोंद होईल.
यापूर्वी नरेश अरोरा यांनी कर्नाटक काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांच्यासाठी काम केले होते आणि त्यांना 2023 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका पार पाडली होती.
Please follow and like us:
