Home ताज्या घडामोडी हरीत सेतु उपक्रमांतर्गत ‘’१५ मिनीटे शहर संकल्पनेसाठी’’ या पायलट प्रकल्पाची निगडी येथे सुरूवात

हरीत सेतु उपक्रमांतर्गत ‘’१५ मिनीटे शहर संकल्पनेसाठी’’ या पायलट प्रकल्पाची निगडी येथे सुरूवात

शहरातील रस्ते सुरक्षीत, सुरळीत आणि लोकाभिमुख रस्त्यांच्या विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव उपक्रम

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत शहरी वाहतूक आणि सर्वसमावेशक शहरनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्राधिकरण, निगडी येथे १५ मिनिटे शहर संकल्पनेसाठी हा भारतातील पहिला पायलट प्रकल्प सुरू केला आहे. हरीत सेतु उपक्रमाचा भाग असलेला हा प्रकल्प सर्व वयोगटातील नागरिकांसाठी सुरक्षित,
निरोगी आणि समावेशी सुरक्षित रस्ते तयार करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे.

या उपक्रमाची अंमलबजावणी महापालिकेच्या नव्याने स्थापन केलेल्या शहरी दळणवळण विभागाच्या माध्यमातून केली जात आहे. हरीत सेतु उपक्रम भविष्यात भक्ति शक्ती मेट्रो स्टेशनसाठी व आकुर्डी रेल्वे स्टेशनसाठी एकात्मिक शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतूक सुविधा प्रकल्प म्हणून कार्यरत होईल, ज्यामुळे विविध प्रकारच्या वाहतुकीच्या संसाधनांना
बळकटी मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल.

सध्या प्रायोगिक तत्वावर सुमारे १०० मीटर लांबीचे रस्ता विकसित करण्यात आला आहे. यामध्ये पायी चालणे, सायकलिंग आणि पावसाचे पाणी व्यवस्थापन यासंबंधी असलेल्या नव्या शहरी धोरणांचा समावेश आहे. त्यामध्ये वृक्षसंवर्धनावर भर देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सुसंगतता साधण्यावर भर दिला जात आहे. रंगीबेरंगी भित्तीचित्रे, सार्वजनिक जागांचा विकास आणि विचारपूर्वक केलेली रस्त्यांची रचना यामुळे सुरूवातीला शंका घेणाऱ्या नागरिकांनी आता या सकारात्मक बदलांचे स्वागत केले आहे.

ग्लोबल डिझाइनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (GDCI) कडून तज्ञ प्रतिनिधी मंडळाने या भागास भेट दिली. यामध्ये तांत्रिक कार्यशाळा, डिझाईन वर्कशॉप आणि प्रत्यक्ष सहभागाच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या सहकार्यात्मक दृष्टिकोनातून लोकाभिमुख रस्त्यांचे डिझाईन करणेसाठी नवनवीन कल्पना आणि तज्ञ मार्गदर्शन
महापालिकेस लाभले.

ग्लोबल डिझाइनिंग सिटीज इनिशिएटिव्हचे कार्यकारी संचालक स्काय डंकेन यांनी पिंपरी चिंचवडच्या या नेतृत्वाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड शहरातील शाश्वत रस्ते विकासाठी एक नवीन मानक तयार करत असून हा प्रकल्प नक्कीच जगभरातील शहरांना प्रेरित करेल, असेही त्या म्हणाल्या. हरीत सेतु प्रकल्प, स्थानिक भागीदारांच्या सहयोगाने राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या डिझाईनचे नेतृत्व प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स (PDA) यांनी केले असून, आशिक जैन यांचे सहकार्य त्यामध्ये त्यांना लाभले आहे. ITDP इंडिया कडून शाश्वत वाहतूक नियोजन तज्ञ मार्गदर्शन मिळाले असून संस्कृती मेनन (CEE) यांनी स्थानिक समुदायाशी संवाद साधण्यास पाठिंबा दिला आहे.

संपूर्ण शहरभर विस्तार करणे, यामध्ये सक्रिय गतिशीलतेचे मार्ग तयार करणे आणि १५ मिनिटे शहर संकल्पनेसाठी उपक्रम अधिक व्यापक पद्धतीने राबविण्यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी अनेक ठिकाणे ओळखली गेली आहेत, ज्यामुळे शाळा, बाजारपेठा, आणि वाहतूक केंद्रे प्रत्येक रहिवाश्याच्या सहज चालण्याजोग्या किंवा सायकलिंगसाठी उपलब्ध होणार आहेत. हरीत सेतु उपक्रमाच्या अंतर्गत, महापालिका २०२६ अखेरीस ९ किलोमीटर सुरक्षित आणि सुलभ चालण्याच्या आणि सायकलिंगच्यामार्गांचा विकास करण्यावर भर देणार आहे.

या प्रकल्पाचे डिझाइन प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स यांनी केले आहे, प्रकल्प व्यवस्थापन पॅव्हेटेक डिझाइन कन्सल्टंट्स यांनी केले आहे आणि BG शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. तसेच यासाठी ग्लोबल डिझाइनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (GDCI) कडून तांत्रिक मार्गदर्शन मिळाले असून यामागचा उद्देश शाश्वत
विकासाला चालना देणे हा आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ग्लोबल स्ट्रीट डिझाईन मार्गदर्शक तत्वांना औपचारिक
मान्यता दिल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका शहरी वाहतूक सुधारणेच्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या दृष्टीने एक अग्रगण्य शहर ठरले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका शाश्वत शहरी वाहतूक आणि सर्वसमावेशक शहरी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. हरीत सेतु उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सुरक्षित, निरोगी, आणि सर्व वयाच्या आणि क्षमतेच्य नागरिकांसाठी समावेशक रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. १५ मिनिटे शहर संकल्पनेसाठी हा पायलट प्रकल्प शहरातील वाहतूक, चालणे आणि सायकलिंगच्या सुरक्षेसाठी आणि लोकांच्या जीवनमानासाठी एक नवा मानक स्थापित करेल. यासोबतच, सार्वजनिक वाहतूक सुलभ, सुरक्षित आणि सुयोग्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम पिंपरी चिंचवडच्या शहरी वाहतूक क्षेत्रातील भविष्य बदलण्याचे आणि शाश्वत वाहतूक धोरणांच्या दृष्टीने नवा आदर्श स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00