Home महाराष्ट्र रेवा राहुल तांबोळी तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये प्रशिक्षणासाठी निवड

रेवा राहुल तांबोळी तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये प्रशिक्षणासाठी निवड

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
मुंबई
पत्रकार राहुल तांबोळी यांची कन्या रेवा प्रबोधिनी राहुल तांबोळी हिने आपली प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर अभिमानास्पद यश संपादन केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली आहे.
 इस्रोमध्ये इंटर्नशिपची संधी मिळावी यासाठी दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी प्रयत्नशील असतात. गुणवत्तेच्या कठोर निकषांवर फक्त निवडक विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळते. त्या पैकी रेवाची निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. विशेष म्हणजे भारताचे चंद्रयान, मंगळयानसह बहुतेक उपग्रह आणि रॉकेट्स ज्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित होतात, त्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये रेवाची निवड झाली आहे.
 सध्या रेवा कोल्हापूर येथील केआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स (स्पेशलायझेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत असून, यासोबतच ती डेटा सायन्स ऑनर्स करत आहे.
 रेवाची कामगिरी यापूर्वी अनेक ठिकाणी झळकली आहे . दोन महिन्यांपूर्वी बंगळुरू येथे झालेल्या गुगल हॅकेथॉनमध्ये तिची निवड झाली होती आणि टेक्निकल टीममध्ये तिने महत्वाची भूमिका निभावली होती.
त्याआधी कोलकत्ता येथील जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी तिची निवड झाली होती.
मागील तीन वर्षांमध्ये तिने तीन रिसर्च पेपर्स प्रकाशित केले असून चौथा पेपर लवकरच प्रकाशनासाठी सज्ज आहे.
नुकत्याच सातारा येथील कुपर कंपनीतील इंटर्नशिपमध्ये सोपवलेला प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
केआयटी कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या सेक्रेटरीपदी तिची निवड झाली असून त्या माध्यमातून ती अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेतृत्व करत आहे.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00