69
पिंपरी
निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया पिं. चिं. शाखेच्या वतीने सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवोदित 40 सनदी लेखापालांचा सत्कार कारण्यात आला. यावेळी रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष अंकित राठी, सचिव गौतम लाड, खजिनदार पिंकी केडिया, श्वेता जैन,विकासा अध्यक्ष पियुष चांडक यांनी शाखेला सदिच्छा भेट देवून कार्याची माहिती घेतली.
यावेळी सीएच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या कौशल्य विकास वर्गाचे उदघाट्न चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाचे केंद्रीय कौन्सिल सदस्य सीए चंद्रशेखर चितळे,सीए पियुष छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे डॉ अशोककुमार पगारिया, सीए किशोर गुजर,विनोद इनामदार या ज्येष्ठ सनदी लेखापालांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाचे केंद्रीय कौन्सिल सदस्य सीए चंद्रशेखर चितळे,सीए पियुष छाजेड तर तसेच नवनियुक्त रिजनल कौन्सिल सदस्य रेखा धामणकर, अभिषेक धामणे, राजेश अग्रवाल यांचा देखील गौरव करण्यात आला .
यावेळी पिं चिं शाखाध्यक्ष पंकज पाटणी,माजी अध्यक्ष सचिन बन्सल, विजय बामणे, सुहास गार्डी, संतोष संचेती,बबन डांगले,चंद्रकुमार छाब्रा ,प्रकाश पमनानी, सुनील कारभारी,सत्यनारायण चौबे, सिमरन लिलवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सीए राठी म्हणाले कि, जे सीए विदयार्थी उत्तीर्ण होणे ही एक यशाची पहिली पायरी आहे.अजून खुप मोठा पल्ला गाठायचा आहे.उत्तीर्ण झाल्यावर संधी मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे.ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्रात काम करा. यशस्वी होण्यासाठी पर्पज, पॉझिटिव्ह, परफॉर्मन्स असे “3 पी” यावर लक्ष केंद्रित करा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीए पंकज पाटणी यांनी केले तर सूत्रसंचालन सिद्धार्थ चोरडिया, अनवा बाबेल यांनी केले.
Please follow and like us:
