Home ताज्या घडामोडी घटस्थापना

घटस्थापना

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

घटस्थापना, नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो. पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकर्‍यांशी येतो. घटस्थापना म्हणजे बीजपरीक्षण होय. आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात, ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते. त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं. दसर्‍यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा केली जाते.
नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्त्वाचे आहे. कलश हे गणेशाचे रूप आहे, देवतांची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते. म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे.
घटस्थापनेचा कलश उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करा. या ठिकाणी दोन इंच मातीत वाळू आणि सप्तामृत कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य (जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी) आणि सप्तमृतिका मिसळून पसरवून घ्या. कलशावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि कुंकू लावा. कलशाला धागा बांधा.
चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे. त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे. मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा. कलशाला हळदकुंकू लावावे. त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश ठेवावं कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा. नारळाला हळदीकुंकू लावावे. कलशाला लाल धागा बांधावा. लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी. हा घट देवी समोर बसवावा. त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करुन धूप, दीप,अगरबत्ती लावून पूजा करावी. नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00