Home पिंपरी चिंचवड बटरफ्लाय पूल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

बटरफ्लाय पूल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

उच्च दर्जाचे एलईडी तंत्रज्ञान वापरत करण्यात आली विद्युत रोषणाई

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

रंगीबेरंगी झगमगाटाने उजळलेला पूल विविध रंगांच्या छटा निर्माण करणारी रोषणाई… असा वेगळाच अनुभव थेरगाव ते चिंचवड दरम्यानच्या बटरफ्लाय पुलावरून प्रवास करताना नागरिकांना येत आहे. पवना नदीवर उभारलेला हा पूल आता रोषणाईच्या झळाळीने अधिकच खुलून दिसत असून, रात्रीच्या वेळी पुलावर साकार होणारा हा रंगोत्सव नागरिकांना आकर्षित करत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच शहरात सौंदर्यपूर्ण वास्तू उभारण्यावर भर दिला जात आहे. थेरगाव येथे पवना नदीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला बटरफ्लाय पूल हा त्याचाच एक भाग आहे. हा पूल आता शहराचे एक नवे आकर्षण ठरत आहे. पुलाचे अनोखे डिझाइन हे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असून, आता महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने पुलावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई त्याच्या देखणेपणात अधिकच भर घालत आहे.

या रोषणाईसाठी उच्च दर्जाचे एलईडी लिनिअर वॉश लाईट्स (खझ65) बसवण्यात आले आहेत. या लाईट्सना 512 डीएमएक्स पॉवरसह आरजीबी तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून, त्यामुळे पुलावरील रोषणाई विविध रंगांच्या छटा निर्माण करत प्रत्येक क्षणी वेगळेच दृश्य साकारते. रात्रीच्या वेळी पुलावरून जाणार्‍या वाहनचालकांसाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी हा अनुभव नेत्रसुखद ठरत आहे. येथील आकर्षक रोषणाईची अनेकजण छायाचित्रे व व्हिडिओ घेत आहेत. त्यामुळे हा पूल फक्त वाहतुकीपुरता मर्यादित न राहता नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नयनरम्य विद्युत रोषणाई
थेरगाव येथील बटरफ्लाय पुलाप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपूल, नाशिक फाटा येथील जे. आर. डी. टाटा उड्डाणपूल यांना नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच भक्तीशक्ती येथील उड्डाणपुलावरील विद्युत रोषणाईचे काम प्रगतीपथावर आहे. या विद्युत रोषणाईसाठी एलईडी दिव्यांचा वापर केल्यामुळे कमी विजेमध्ये आकर्षक रोषणाई होत आहे.

बटरफ्लाय पुलावर फसाड पद्धतीची विद्युत रोषणाई केली आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमुळे कमीत कमी वीज खर्ची पडते. या पुलावरील विद्युत रोषणाईचा एकूण लोड फक्त 22 किलोवॅट आहे. अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरातील इतर पुलांवरदेखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन आहे.
अनिल भालसाकळे,

बटरफ्लाय पूल हा केवळ थेरगाव आणि चिंचवड यांना जोडणारा दुवा नसून, पिंपरी चिंचवड शहराच्या आधुनिक आणि सौंदर्यपूर्ण ओळखीचे प्रतीक आहे. या पुलावरील आकर्षक रोषणाईमुळे नागरिकांना नवा अनुभव मिळत आहे. या पुलाचे सौंदर्य जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00