चिंचवड
शाहूनगर येथील शिवशंभो फौऊंडेशन आणि शहराचे माजी उपमहापौर, नगरसेवक व शिवशंभो प्रतिष्ठाणचे संस्थापक केशव घोळवे हे शिवशंभो प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांसह मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून गेले आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त शेळगांव ता. परांडा जिल्हा धाराशिव येथील नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचे किट, जनावरांना चारा तसेच पूरामुळे नुकसान झालेल्या शाळेला भरीव आर्थिक मदत केली आहे.
उपमहापौर केशव घोळवे हे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, श्रमिकांचे अधारवड म्हणुन ओळखले जातात. राज्यातील कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. ऊसतोड कागारांचा प्रश्न असो, स्मशान जोगी कामगारांचा प्रश्न असो, शिक्षकांचा प्रश्न असो की कष्टकरी असंघटीत कामगारांचा प्रश्ना असो, की आशा वर्कर, पॅरा मेडीकल कर्मचारी, बालवाडी सेविका, शिक्षिका, महापालिकेचे बॉडी स्कॉड कर्मचारी, वाहनचालक मदतनीस कामगार अशा सर्व प्रकारच्या कर्मचार्यांसाठी केशव घोळवे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे व ते प्रश्न सोडविले आहेत. जेथे वेदना तेथे केशवजींचा मदतीचा हात असतो. मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या वेदनांना मदतीसाठी मग केशवजींचे हात सरसावणारच.
केशव घोळवे यांनी लगेचच त्यांच्या शिवशंभो फौंऊंडेशन मार्फत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धांव घेतली आणि शेळगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट 450. पशुधनांसाठी 10 टन चारा, मुरघास व 750 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेला पुनर्बांधणीसाठी 1,53,000 रुपयांची मदत. देवू केली आहे. यावेळी झालेल्या समारंभास धाराशीव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष डॉ. श्री सुभाषराव मोरे, श्री . संभाजीराव मोरे ( प्राचार्य), श्री . विष्णू नाना शेवाळे (सरपंच), श्री अमर मोरे (युवा उद्योजक), श्री विलास मोरे, श्री. विजय परदेशी, श्री. वैभव शेवाळे, श्री . कुमटकर सर (मुख्याध्यापक), श्री. काळे जी.डी (मा प्राचार्य ), श्री. मोहन शिन्दे, श्री. सुनिल इनामदार, श्री. शिंगाडे, श्री बाबुराव दैन (लिपिक), श्री. बाळासाहेब शेवाळे , श्री भाऊसाहेब शेवाळे, श्री जीवन मोरे, शिवशंभो फाउंडेशन शाहूनगर चिंचवडचे अध्यक्ष, उद्योजक श्री संजय अनंत तोरखडे, शासकीय कॉन्ट्रॅक्टर श्री बाळासाहेब माळी, उद्योजक श्री महेंद्र पाटील, उद्योजक श्री बजरंग गडदे, उपाध्यक्ष कामगार नेते श्री संजय जयसिंग देशमुख, कोषाध्यक्ष श्री काळुराम साकोरे, विश्वस्त कामगार नेते श्री दत्तात्रय भुसे, विश्वस्त श्री खंडू बारवकर, विश्वस्त श्री विकास शेवाळे, विश्वस्त श्री कैलास पोखरकर, शिव शंभो महिला मंडळाच्या राणे काकू, कीर्तनकार ह.भ.प.सौ सविता बारवकर, सौ रेणुका हजारे, सौ सीमा साकोरे, सौ ज्योती भुसे, सौ. अरुणा घोळवे, सौ.वृषाली गडदे, सौ. उज्वला शेवाळे, सौ .सारिका माळी, शिवशंभो युवा मंचचे प्रसाद पाटील, हर्षद शेवाळे, यश घोळवे, अभिषेक बारवकर, सार्थक भुसे, साई गांगुर्डे, सर्वज्ञा शेवाळे आदी प्रमुख उपस्थिीत होते.
