42
चिंचवड
येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या “कोस्टल कलिनरी फूड फेस्टिव्हलमधून समुद्र किनारी असलेले कोंकण, इंडोनेशिया आणि थायलंड या देशातील संस्कृतीचे दर्शन घडवून आणले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद पाटील, हॉ. कॉनरॉडचे महाव्यस्थापक अभिषेक सहाय, रॅडीसन हॉटेलचे महाव्यवस्थापक पंकज सक्सेना, कॅम्प एजुकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती,
उपाध्यक्ष यु. टी. पुंडे, सचिव बी. व्ही. जवळेकर , खजिनदार एस. डी. अगरवाल, सदस्य डॉ. आय. एस. मुल्ला,प्राचार्य. डॉ. अजयकुमार राय आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी परिधान केलेला विविध प्रांतीय पोशाख, सर्वत्र केलेली सजावटी मुळे खरोखरच “कोस्टल फुड”चा आंनद घेण्यासाठी आल्याचा अनुभव घेतला. या खाद्य महोत्सवात सर्व पदार्थ पारंपारिक शैलीत बनविलेले कोकणी अळू वडी, कोबी भाजी, वांगी मसाला, फणसाची भाजी, घावन, तांदळाची भाकरी, पावटा भात, कोंकणी डाळ ,उकडीचे मोदक, मूंग डाळीचे कढण, इंडोनेशियाचे सोतो सूप, बेतुटू , पनीर स्प्रिंग रोल, इकन बाकर , चिकन रेंडंग , कॅनई रोटी, नस्वी, गोरेंग , कोकोनट बावारोस आणि थायलंडचे टॉम यम सूप, थाई पीनट कौलीफ्लॉवर विंग्स, चिकन सताय, थाई मस्सामन करी, थाई ग्रीन चिकन करी, थाई टी क्रीम बृले पदार्थ बनविण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक कोंकणी नृत्य सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. त्यामध्ये कोंकण, इंडोनेशिया आणि थायलंड येथील पारंपारिक वेशभूषा केलेला रॅम्प वॉक प्रथम व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले. तसेच तृतीय वर्षातील राहुल या विद्यार्थ्याने फ्लाईरोलॉजी सादर केले. विद्यार्थ्यांनी केलेला शेवटचा रॅम्प वॉक लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजयकुमार राय यांनी केले. सूत्रसंचालन प्राची कोल्हे, शिफा सिंग यांनी केले. तर वेदांत हिरेमठ यांनी आभार मानले.
Please follow and like us:
