Home पिंपरी चिंचवड समर्पित भावनेतून समाजसेवेची मिळाली प्रेरणा!

समर्पित भावनेतून समाजसेवेची मिळाली प्रेरणा!

 आमदार महेश लांडगे यांची भावनिक प्रतिक्रिया

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 अभिष्ठचिंतन मासनिमित्त 100 हून अधिक कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड

गेली 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस महिनाभर साजरा व्हावा, हा चमत्कार आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. यावर्षीचा वाढदिवस सफाई व घर कामगार माता-भगिनींना समर्पित करण्यात आला. त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद वाटला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये कष्टकऱ्यांचा सन्मान करीत विधायक पद्धतीने अभिष्ठचिंतन झाले. समर्पित भावनेतून आणखी सकारात्मक ऊर्जेने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो दादाप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त महिनाभरात भोसरी विधानससभा आणि शहर व ग्रामीण भागामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम असे 100 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.

या आनंददायी प्रसंगी, सवपक्षीय लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्तरावरील मित्रपरिवाराबरोबरच राज्यस्तरीय अनेक मान्यवरांनी देखील शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, तसेच अनेक कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेचे आमदार, विधानसभा सदस्य यांसह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी लांडगे यांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा संदेश दिला आहे.

विधायक उपक्रमांनी आदर्श…
महिनाभरात झालेल्या रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यामधून 2 हजाराहून अधिक पिशव्या रक्तसंकलन झाले आहे. विशेष म्हणजे, 10 हजाराहून अधिक नागरिकांनी आरोग्य शिबिरांमधील विविध सेवांचा लाभ घेतला आहे. तसेच, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक प्रबोधनाचे उपक्रमांनी शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, ‘‘हिंदुभूषण क्रीडा महोत्सव’’ यांमुळे तब्बल 10 हजाराहून  भोसरीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात सकस उपक्रमांची रेलचेल दिसून आली. यावर्षीचा वाढदिवस आमदार लांडगे यांनी ’’सफाई व घरकामगार माता-भगिनींना समर्पित’’ केला आहे. या निमित्त 4 हजार 320 महिलांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना भेटवस्तू देण्यात आली. तसेच, संबंधित माता-भगिनींना शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 पासून शहरात अत्यंत सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची संधी मिळाली. माय-बाप पिंपरी-चिंचवडकरांनी ठेवलेला निरंतर विश्वास हा माझे बलस्थान आहे. माझे सहकारी आणि मित्र परिवार यांनी सामाजिक कार्याचा हा वसा जोपासला आहे. या सामाजिक उत्सवामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये समाजाभिमुख कार्याची नवी परिभाषा वैभवाने साकार झाली आहे. या पुढील काळात देव–देश–धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी समर्पित भावनेतून कार्यरत राहीन.”
 महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00