Home पिंपरी चिंचवड पत्रास कारण की…’ रसिकांच्या मनाला भिडला

पत्रास कारण की…’ रसिकांच्या मनाला भिडला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात सादर झालेल्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 पिंपरी

  शब्दांच्या शिल्पातून उमटणाऱ्या भावनांची फुलेकधी वेदनेचा गंध तर कधी आशेचा सुगंध देणारा पत्रास कारण की…’ हा लेखक अरविंद जगताप लिखित पत्रवाचनाचा कार्यक्रम रसिकांच्या हृदयाला भिडला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सादर झालेल्या या सादरीकरणाने हरवलेल्या पत्रलेखन परंपरेला नवजीवन दिले. शब्दांच्या ओळींतून वाहणारी माणुसकी आणि संवेदनांचा एकप्रकारे साक्षात्कारच यानिमित्ताने रसिकांना घडला.

 पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्यानेतसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालयभोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालयचिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणाऱ्या या महोत्सवात पत्रास कारण की…’ या कार्यक्रमाचे सादरीकरण अभिनेते सागर कारंडेउर्मिला कानेटकरप्रसाद बेडेकर आणि मनोज डाळींबकर या मान्यवर कलाकारांनी केले. याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोरविशेष अधिकारी तथा मराठी समन्वय अधिकारी किरण गायकवाडअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह महापालिकेतील अधिकारीकर्मचारी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रपेटीगावातील कट्टा आणि पोस्टमनची सायकल या साध्या पण अर्थपूर्ण नेपथ्याने कार्यक्रमाचे भावविश्व अधिक जिवंत केले. प्रत्येक पत्रासोबत प्रेक्षागृहात कधी शांतता पसरलीतर कधी टाळ्यांचा गजर झाला. या कार्यक्रमात वाचण्यात आलेली पत्रे म्हणजे जणू काळाच्या पोटात दडलेले आयुष्याचे तुकडे होते. मुंबईत कामासाठी गेलेल्या मुलीने आपल्या गावाकडील आईला लिहिलेल्या पत्रात शहरातील महिलांच्या समस्या मांडल्यात्या शब्दांनी स्त्रीजीवनाची अस्वस्थ वेदना थेट रसिकांपर्यंत पोहोचली. एका मुलीने आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रातून हुंडाविरोधी ठाम भूमिका आणि स्त्रीस्वातंत्र्याचा आवाज उमटला. प्रिय विद्यार्थी मित्रांनो’ या पत्रातून एका शिपायाने विद्यार्थ्यांना दिलेले जीवनमूल्यांचे धडे टाळ्यांचा वर्षाव करून गेले. समस्त मनुष्यप्राण्यांनो’ या पत्रात भुताच्या नजरेतून माणसाचे दर्शन घडले. प्रिय किशोरकुमार’ या पत्राने एका चाहत्याच्या हृदयातील कृतज्ञता शब्दांत साकारली, ‘प्रिय सोशल मीडिया’ या पत्राने आधुनिक काळातील संवादहीनतेचा आरसा दाखवलातर प्रिय शोषित स्त्रियांनो’ या पत्रात एका पुरुषाने मनापासून माफी मागत स्त्रीवेदनेला शब्द दिले. प्रिय सचिन’ या पत्राने क्रिकेटप्रेम आणि भावना दोन्हींचा संगम घडवलातर ती सध्या काय करतेय’ या पत्राने हरवलेल्या आठवणींचे कोमल स्मरण करून कार्यक्रमाला हळवी सांगता दिली.

पत्रवाचनाच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये एकप्रकारे समाजाच्या विविध स्तरांतील भावना रंगवल्या गेल्या. अनेक रसिकांच्या डोळ्यांत शब्दांनी जागवलेल्या भावनांचे अश्रू दाटले होते. प्रत्येक पत्रानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमधून या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनाला किती खोलवर स्पर्श केलायाची प्रचिती मिळाली. या सादरीकरणाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाला एक संस्मरणीय स्वरूप दिले. या कार्यक्रमाला नेपथ्य विनायक परदेशीप्रकाशयोजना अभिप्राय कामठे यांनी तर संगीत पंकज चव्हाण यांनी दिले.

सुंदर मी होणार’ नाटकाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

पू. ल. देशपांडे यांच्या अप्रतिम लेखनशैलीतून साकारलेले सुंदर मी होणार’ हे अजरामर नाटक अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने सादर झाले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित या प्रयोगाने सभागृहात हास्यटाळ्यांचा गजर आणि भावनांचा झंकार निर्माण केला. या नाटकातील विविध व्यक्तिरेखांना सजीव करणारे कलाकार म्हणजे विद्याधर जोशीअभिजित चव्हाणस्वानंदी टिळेकरअनिरुद्ध जोशीसृजन देशपांडेश्रुती पाटीलविरजस ओढेकरआस्ताद काळे आणि श्रृजा प्रभूदेसाई. प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयातून पात्रांच्या भावविश्वाला झळाळी दिली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांच्या कलेचे कौतुक करतानाच पू. ल. देशपांडे यांच्या लेखनातील ताजेपणा आणि सादरीकरणातील सहज विनोदबुद्धी यांची सांगड अनुभवली. सुंदर मी होणार’ या नाटकाने केवळ मनोरंजन केले नाहीतर समाजातील दिखाऊपणा आणि मानवी नात्यांतील गुंतागुंतीवरही आरसा दाखवला. या नाटकातील विचार करायला लावणारा प्रत्येक प्रसंग रसिकांच्या मनात खोलवर उतरला. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाला आणि दिग्दर्शकांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला रसिकांनी उभे राहून दिलेल्या टाळ्यांच्या गजरात नाटकाची सांगता झाली. विशेष म्हणजे ५० च्या दशकात लिहिलेल्या सुंदर मी होणार‘ या नाटकाला आजच्या सादरीकरणाला तरुण मुला मुलींचा चांगला प्रतिसाद लाभला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाला ३ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली असून ९ ऑक्टोबरला सांगता होणार आहे. या सप्ताहात साहित्यिक चर्चागझलअभंगभजनकविसंमेलनविविध स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रमशाहिरी पोवाडेएकांकिकालोककला कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जात असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

 तृप्ती सांडभोरअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील रसिकांसाठी मराठी भाषेतील कार्यक्रमांची मोठी मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहआकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहभोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहपिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर अशा विविध ठिकाणी हे कार्यक्रम होत असून सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.

 किरण गायकवाडविशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारीपिंपरी चिंचवड महापालिका

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00