Home पुणे तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून  महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला  त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले

तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून  महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला  त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले

 फुले वाड्यात तेलंगणा राज्यातील सत्यशोधकांचा फुले एज्युकेशन तर्फे सन्मान 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे /समताभूमी

 फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त वं भारतीय संविधान अमृत महोसत्वी वर्ष पुर्ती निमित्त तेलंगणा,आदिलाबाद येथील  सत्यशोधक प्रा .सुकुमार पेटकुले , ज्येष्ठ विचारवंत ,कवी मधु बावलकर किनवटचे जेष्ठ कवी अशोक वसाटे यांचा सन्मान  नांदेड चे निवृत्त रेल्वे अधिकारी बी.व्ही.गायकवाड यांच्या व अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक  यांचे शुभ हस्ते  सामाजिक कार्याबद्दल

महात्मा फुले उपरणे ,मोती हार घालून भारतीय संविधान  आणि फुले दाम्पत्य यांचे जीवनचरित्र मराठी,हिंदी,इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ग्रंथ भेट देऊन दि. 5.1.2025 रोजी रात्री 7 वाजता समता भूमीवरील फुले वाड्यात सन्मानित   करण्यात आले. या वेळी प्रथम प्रा.पेटकुले आणि गायकवाड यांचे  शुभहस्ते प्रथम थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि  विधेची  खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी किनवट चे कवी अशोक यांनी सावित्रीमाई आणि भिडे वाडा यावर कविता सादर केल्या त्यामुळे संपूर्ण फुले दांपत्य यांच्या कार्याचा जीवनपट उलघडा गेला तर नांदेड च्या उषा गायकवाड यांनी जेष्ठ कवी प्रवीण दवणे यांची लेखक रघुनाथ ढोक यांचे पुस्तकातील सावित्रीमाई फुले यांचेवरील ज्ञानज्योती ही कविता सादर केली.

याप्रसंगी सत्यशोधक सुकुमार पेटकुले यांनी सन्मानास उतर देताना म्हंटले की आम्ही तेलंगणा, राज्यात फुले दांपत्य यांचे जीवनावरील कोण बनेगा करोडपती धर्तीवर प्रश्न उतरे स्पर्धा भरवून एका प्रश्नास एक हजार रुपये बक्षीस देऊन दरवर्षी लाखो रुपये बक्षीस देत आलो तसेच सार्वजनिक सत्यधर्म व इतर पुस्तके तेलगु भाषेत प्रकाशित करून लवकरच महात्मा  फुले समग्र वाड्मय तेलगु आणि हिंदी भाषेत प्रकाशित करणार आहोत. त्याच प्रमाणे सपूर्ण तेलंगणा, राज्यात फुले दांपत्य यांचे १५० चे वर पुतळे असून एकाचे  उद्गघाटन दुब्बागुडा येथे सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि शिवदास महाजन यांनी प्रमुख पाहुणे केले आहे.. पुढे पेटकुले म्हणाले की यावर्षी पासून सपूर्ण तेलंगणा,राज्यात सरकारने ३ जानेवारी २०२५ पासूनच  ज्ञानाई सावित्रीमाईची सर्वाना प्रेरणा मिळावी यासाठी  ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रम घेऊन  साजरा केला तसेच महाराष्ट्र सरकारने सुरु करावा अशी देखील आशा व्यक्त केली .या सर्व कार्यात आमचा खारीचा वाटा असल्याने ढोक यांनी आमचा सत्कार या फुले वाड्यात केल्याने आम्ही उपकृत झालो आहोत.

जेष्ठ विचारवंत कवी मधु  बावलकर म्हणाले की भारताचे संविधान  लिहिणारे जागतिक कीर्तीचे बाबासाहेब  आंबेडकर आणि त्यांचे गुरु महात्मा फुले यांनी ज्या वाड्यातून जगाला समतेची ,मानवतेची बीजे पेरली बहुजनांना शिक्षणाचे दारे खुली केली त्या वास्तूमध्ये आमचा सन्मान संविधान देऊन होतो आहे हे आमचे परमभाग्य असून आम्हास एक ऊर्जादायी प्रेरणा उर्वरित कामासाठी मिळाली याचे मोल करता येणार नाही एवढा मोठा आनद या सत्काराने झालेचे उद्गार काढले.

यावेळी सत्यशोधक ढोक यांनी स्वागत व प्रास्ताविक मध्ये सुकुमार पेतकुले  यांनी आमचे फुले एज्युकेशन ला  तेलंगणा,राज्यात प्रथम सत्यशोधक विवाह लावण्याची संधी सोबत स्वताःचे उच्चशिक्षित मुलीचे व मुलाचे आणि एक इतर असे ४ सत्यशोधक विवाह लावण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच महात्मा फुले यांचे एक पात्री मधून व  इतर कार्यातून फुले दांपत्या यांच्या कार्याचा प्रसार करीत  कृतीशील वारसा चालवीत आहात म्हणून हा सन्मान आयोजित केल्याचे सांगितले आणि शेवटी ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गावून कार्यक्रमाची सांगता केली. आलेल्या सर्व मान्यवर आणि चळवळीचे कार्यकर्त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी ग्रंथ भेट दिले यासाठी मोलाची मदत आकाश-क्षितीज ढोक यांची झाली.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00