Home पुणे तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे आयोजन

तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन होणार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत फर्ग्यूसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात येणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. संमेलनाचे उद्धाटन होणार आहे. यामध्ये साहित्यरसिकांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषेदच्या     उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री  माधुरी  मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी उपस्थित राहणार आहे.

संमेलनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच, प्र.के. अत्रे सभागृह (ॲम्फी थिएटर) तयार करण्यात आले असून या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार 31 जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्यूसन कॉलेजपर्यंत शोभायात्रा, उद्घाटन समारंभ, परिसंवाद- माझी मराठी भाषा अभिजात झाली, लेखक भास्कर हांडे लिखीत छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र तसेच बालभारतीच्या अभिजात मराठी  विषयावरील ‘किशोर’ या अंकाचे प्रकाशन, मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे, नव्या-जुन्यांचे कवी संमेलन, मराठीचा झेंडा अटकेपार, महाराष्ट्राची महासंस्कृती, मराठीच्या बोलींच्या सर्वेक्षणाबाबत सादरीकरण, अनुवाद विषयक चर्चासत्र, परिसंवाद कार्यक्रम होणार आहे.

शनिवार, 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट् माझा-जाखडी, नमन, भारुड, गोंधळ, पोवाडा, पालखी, वाद्यांची जुगलबंदी, प्रशासनातील मराठी भाषा, परिसंवाद-समाज माध्यमांवरील प्रभावी व्यक्तीमत्वे, विज्ञान तंत्रज्ञानातील मराठीचा वापर, बाल साहित्याचा अविष्कार, परिसंवाद- नाटक, चित्रपटातील मराठी भाषा, स्वरसंध्या- अभिजात भावसंगीत, अभंग नाट्यसंगीताची सुरेल मैफिल, कार्यशाळा- व्यंगचित्रांची दुनिया (चिंटू) शालेय विद्यार्थ्यांसाठीचा विशेष कार्यक्रम, बालसाहित्याचा अविष्कार, परिसंवाद-वंदे मातरम : स्वातंत्र्य प्रेरणेची 150 वर्षे, महिला कायदा व महिलांना न्याय मराठी भाषेत, मराठी भाषेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर (एआय), कार्यशाळा: माध्यमांची लेखणी, आराधी लोकनृत्य, दिंडी लोकनृत्य, ज्ञानपीठाचे ज्ञानतपस्वी हे कार्यक्रम होणार आहे.

रविवार, 2 फेब्रुवारी रोजी अभंगवाणी, मराठी उद्योजकांचे चर्चा सत्र, मराठी भाषा आणि स्त्री साहित्य, ग्रामीण वास्तव आणि मराठी साहित्य, मराठीचे ग्रंथ वैभव, मराठी भाषा आणि युवक, स्वरझंकार- मराठी संगीताचा बहारदार नजराना, बृहन्महाराष्ट्र मंडळ- सादरीकरण, अध्यात्मातील अभिजात मराठी, अभ्यासक्रमातील मराठी भाषा: वाटचाल, मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी, बालगंधर्व रंगमंदीर येथे सागरा प्राण तळमळला, चाणक्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून संमेलनाची सांगता होणार आहे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00