18
पुणे
ऑपरेशन सिंदूर या विशेष उपक्रमांतर्गत एकूण ५ व्हिडिओ व्हॅन्सचे उद्घाटन माननीय महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते महापालिका मुख्य भवन येथे करण्यात आले.
या व्हॅन्समध्ये माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन करणारे संदेश प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या व्हॅन्स पुणे शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांसाठी माहितीपट व संदेश दाखविणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना ऑपरेशन सिंदूर या उपक्रमाची माहिती मिळेल तसेच सैनिकांप्रती आदर व गौरव व्यक्त केला जाईल
Please follow and like us:
