पुणे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरोग निर्मूलनाची महात्मा गांधी सभागृह,जिल्हा परिषद येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वंदना वसावे जिल्हा सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. भाग्यश्री पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडीत करण्याकरिता घरोघरी येणाऱ्या पथकास नागरिकांनी सहकार्य करावे. करणेस सहकार्य करावे. कुष्ठरोग आजार हा सूचिबद्ध झाल्याने खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी याची नोंद शासकीय जिल्हा स्तरीय आरोग्य संस्थेत करणे बंधनकारक आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.
श्री गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे जिल्हा परिषद: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत सर्व ग्रामीण व ठराविक शहरी भागात “कुष्ठ रुग्ण शोध मोहीम” राबविण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टर आणि आरोग्य संस्था यांनी कुष्ठरोग प्रतिबंध व उपचार मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.
डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी: कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार असून योग्य वेळी निदान आणि नियमित औषधोपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होतो. परंतु उपचारात विलंब झाल्यास शरीरावर विकृती, दिव्यांगत्व निर्माण होऊ शकतो. राज्य शासनाने पुढील तीन वर्षांत “कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र” हे ध्येय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद करणे आणि ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल स्वरूपात सादर करणे सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय संस्थांना बंधनकारक राहील.या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन करतो.
डॉ भाग्यश्री पाटील, सहाय्यक संचालक कुष्ठरोग: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार “कुष्ठरोग” हा आजार राज्यातील अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा निर्णय राज्य शासनाने “कुष्ठरोग निर्मूलन” या उद्दिष्टाच्या दिशेने घेतलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी निकट संपर्कातील व्यक्तींना केमोपोफिलॅक्सिस देण्याची सोय करण्यात येणार आहे.औषध-प्रतिरोधक कुष्ठरोग रुग्णांच्या निदान व व्यवस्थापनासाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
