Home पुणे कलार्पण संगीत विद्यालयतर्फे  शास्त्रीय  संगीत वारसा अमेरिकेत.

कलार्पण संगीत विद्यालयतर्फे  शास्त्रीय  संगीत वारसा अमेरिकेत.

शिष्याची प्रगती हा गुरुसाठी आनंदसोहळा

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पं. सुधाकर तळणीकर यांचे प्रतिपादन

अमेरिकास्थित कवी गायक अमेय बनसोड यांच्या

काव्यमेय‘ कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

 

पुणे

आपल्या शिष्याने केलेली प्रगतीहा गुरुसाठी आनंदसोहळा असतो. आज मी असा आनंद अनुभवत आहे”असे उद्गार प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक गुरू सूरमणी पं. सुधाकर तळणीकर यांनी  काढले.

पुण्यातील ‘कलार्पण’ संस्थेतर्फे अमेरिकेतील गायक कवी अमेय बनसोड यांच्या ‘काव्यमेय’ या कवितासंग्रहचे प्रकाशन भरत नाट्यमंदिरसदाशिव पेठ येथे झाले. यानिमित्ताने सुगम संगीतनाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी तळणीकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत दाणीउत्तर प्रदेश येथील कलार्पण संस्थेचे दिगंबर तिवारीगायक प्रा. विठ्ठल कुमावत व्यासपीठावर उपस्थित होते.

पं. तळणीकर यांनी अमेय बनसोड यांनी कलाक्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. अमेरिकेत आधी शिक्षणासाठी आणि आता नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करणाऱ्या अमेयने मी जे शिकवले ते अल्पावधीत आत्मसात केले आहे. मला त्याचा आनंद आहे. यापुढे त्याने अशीच मेहनत करावी. जे शिकवले ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावेतअसेही ते म्हणाले.अभिनेते चंद्रकांत दाणी यांनी अमेरिकेत स्थायिक होऊनही अमेय यांनी जपलेले भारतीय कलेचे प्रेम उल्लेखनीय आहे. आपल्या मातीशी तो जोडलेला आहे. संगीताप्रमाणे कवितासंग्रहाच्या रुपाने त्याने साहित्य प्रेमही जपले आहेअसे ते म्हणाले.

 सूरमणी पं. सुधाकर तळणीकर आणि ‘काव्यमेय’ काव्यसंग्रहाचे कवी गायक अमेय बनसोड (अमेरिका) यांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला समर्पक साथ मंदार तळणीकर (सहगायन व हार्मोनियम) आणि पल्लवी लोखंडे (सहगायन व तानपुरा)केदार तळणीकर (तबला) आणि गणेश पापल (पखवाज) ओंकार पाटणकर (सिंथेसायजर) शुभम गुंद्देट्टी (हार्मोनियम) यांनी केली. भास्कर पावसकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशनानंतर सादर झालेल्या या संगीताच्या कार्यक्रमात सुगमनाट्यसंगीत व अभंगवाणीचा समावेश होता. काही संगीतरचना पं. सुधाकर तळणीकर यांच्या होत्या.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गायक, कवी अमेय बनसोड यांनी पंढरीच्या तिरीजय गंगे भागीरथीया विठुचा गजर हरिनामाचासुरत पियाहरिभजनाविण काळ घालवू नको रेजय शंकरासूर निरागस होघेई छंदइत्यादी  गीते सादर करून रसिकांना  खिळऊन ठेवले आणि रसिकांची दाद मिळवली. तर गायक  संगीतकार मंदार तळणीकर यांनी पटदीप रागातील मर्म बंधातली ठेव ही  हे नाट्यगीत आणि माझे माहेर पंढरी सादर करून दुर्गा रागाचा  देखील वेगळा स्वराभास रसिकांना दाखवला आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर कार्यक्रमाच्या सूरमणी पं. सुधाकर तळणीकर यांनी कानडा राजा पंढरीचा, जुन्या ठेवणीतील ठुमरी व तराना गाऊन रसिकांची मने जिंकली त्यांच्या गाण्यातून आलापीतून संगीतमय धबधबा याची अनुभूती आली ही सर्वात मोठी रसिकांची दाद होती.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00