23
वाकड
वाकड पुण्य स्मरणाच्या कार्यक्रमास आलेल्या नातेवाईकांना केशर आंब्याचे शंभर रोपटे भेट देवून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला.
वाकड येथील भुजबळ कुटुंबीयांनी आयोजित केलेले कांताबाई वसंतराव भुजबळ (वाकड) यांचे दहावे पुण्यस्मरणाचे निमित्त होते.भुजबळ कुटुंबियांच्या या कृतिमुळे वाकड परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी ह. भ. प. लहु महाराज जमदाडे यांनी प्रवचन रूपी सेवा दिली.
ह.भ.प. श्री लहु महाराज जमदाडे यांनी कै कांताबाई वसंतराव भुजबळ यांच्या कार्यकाळात केलेल्या समाजकार्याची आणि कुंटुबांच्या आठवणीना उजाळा दिला,तसेच त्या कार्यक्रमात आंब्याचे रोपटे देण्यात आले.
यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, भरत आल्हाट, विशाल कलाटे, राम वाकडकर , संपत विनोदे, हनुमंत माळी, प्रकाश जमदाडे, दादासाहेब मदने, बबनराव चाकणकर, कविता आल्हाट, विजय दर्शले, विशाल वाकडकर, रंजित कलाटे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते 100 केशर आंबा रोप वाटण्यात आले.
Please follow and like us:
