73
पुणे
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई कबड्डी संघ टाळगाव चिखली यांच्या सहकार्याने चिखली, पिंपरी येथे दि.२२/१/२०२५ते२३/१/२०२५ दरम्यान पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड विभाग ७२व्या वरिष्ठ गट महिला निवड झाली चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत पिंपरी चिंचवड मनपाच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाने महेश दादा स्पोर्ट्स भोसरी कबड्डी संघास ३५-२८,अशा७ गुणांच्या फरकाने पराभव करीत विजय संपादन केला. या विजयाने वरिष्ठ गट महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतही सलग दुसऱ्या वर्षी विजय मिळविण्याचा बहुमान सदर संघास प्राप्त झाला आहे. याच संघाने कुमारी गट निवड चाचणी जिल्हास्तर कबड्डी स्पर्धेतही सलग दोन वर्षे विजयी होण्याचाही बहुमान मिळवला आहे. विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत श्री पंकज पाटील उपायुक्त क्रीडा, श्री किशोर ननवरे क्षेत्रीय अधिकारी ग प्रभाग ,श्रीमती अनिताताई केदारी क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा, श्री ग्यानचंद भाट प्रशासनाधिकारी क्रीडा विभाग, श्री बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
किर्ती कडगंची हिच्या कुशल नेतृत्वाखाली भूमिका गोरे ,रूपाली डोंगरे ,सविता गवई, ,मनिषा राठोड,रेखा राठोड , सिफा वस्ताद, श्रावणी सावंत,पूजा तेलंग,भारती किरवे, दिव्या कांबळे , पायल डाडर या खेळाडूंच्या सांघिक प्रयत्नांने सदर संघास विजय सहजच मिळविता आला.
सदर संघास महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह श्री बाबुरावजी चांदेरे यांचे शुभहस्ते व पुणे जिल्हा असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री दत्ता कळमकर ,श्री दत्तात्रेय झिंजुर्डे सरकार्यवाह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री राजेंद्र काळोखे , सूर्यकांत मुटके, श्री दत्ता माने , श्री दीपक धावडे, श्री शेखर रावडे, श्री राजेंद्र पानसरे, श्री अनिल यादव, श्री संदीप नेवाळे सामाजिक कार्यकर्ते, श्री प्रवीण नेवाळे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, यांचे उपस्थितीत “विजय चषक “देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर संघास श्री बन्सी आटवे क्रीडा पर्यवेक्षक , श्रीमती सोनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन व रोनित आवाड यांचे सहकार्य लाभले आहे.
Please follow and like us:
