Home पुणे बुधवार पेठ येथे एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती मेळावा संपन्न

बुधवार पेठ येथे एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती मेळावा संपन्न

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात जनजागृतीपर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून औंध रुग्णालयाचे एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग व पुणे शहर एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ रामेश्वर मार्केट येथे लक्षगट भगिनीकरीता एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती करीता मेळावा आयोजित करण्यात आला.

 यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरवदे एडस् संसर्गितांचे मूलभूत हक्क प्रदान करणारा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदालैंगिक आरोग्य आदीबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांच्या शंकाचे निरसन  करण्यात आले.

 पुणे शहर एड्स नियंत्रण सोसायटीचे कर्मचारीआयसीटीसी व डीएसआसी विभाग ससून रुग्णालयसोनावणे रुग्णालयदळवी रुग्णालयऔंध रुग्णालयाचे कर्मचारीजॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्टमंथन फाउंडेशनरिलीफ फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00