पुणे
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत आयोजित 14 हजार 216 उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ७८ हजार २८८ इतक्या मतदारांनी सहभाग घेतला आहे. येत्या 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
बारामतीतालुक्यात 40 हजार, मावळ 69 हजार 790, मुळशी 43 हजार 835, शिरुर 70 हजार 356, हवेली 33 हजार 568, दौंड 34 हजार 416, इंदापूर 2 हजार 998, पुरंदर 1 हजार 627, भोर 6 हजार 856, वेल्हे 25 हजार 296, आंबेगाव 60 हजार 223, जुन्नर 81 हजार 500 आणि खेड तालुक्यात 7 हजार 820 असे एकूण 4 लाख 78 हजार 288 मतदारांनी सहभाग घेतला आहे
मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदार यादीत नाव शोधणे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट 1 हजार 775, पदयात्रा- 66 हजार 631, कलापथक, पथनाट्य 8हजार 957, सायकल यात्रा 15 हजार 431, मानवी साखळी 14 हजार 903, मतदारांना शपथ 1 लाख 26 हजार 770, गृहभेटी 41 हजार 315, महिलांकरिता मतदान जागृती विशेष कार्यक्रम 32 हजार 368, स्टेटस दिवस, सेल्फी दिवस, समाज माध्यमांचा वापर 7 हजार 168, प्रभातफेरी, मतदार जागृती फेरी 80 हजार 839, चित्रकला स्पर्धा 23 हजार 680, रांगोळी 20 हजार 239, इतर (संकल्पपत्र) 38 हजार 212 असे एकूण 14 हजार 216 उपक्रमाच्या माध्यमातून मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
