पिंपरी
या देशात असणारे मुस्लिम बांधव हे देशावर निस्सिपणे प्रेम करणारे आहेत असे प्रतिपादन माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आझम पानसरे यावेळी बोलताना म्हणाले की आज देशात मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मुस्लिम बांधवांनी मतदान करण्याची आवश्यकता आहे. देशातील अल्पसंख्यांक समाजाला देखील कौटुंबिक व आर्थिक सुरक्षा पुरवणारे सरकार निवडून देण्याची गरज आहे. जर सामाजिक कौटुंबिक व आर्थिक सुरक्षेसाठी मुस्लिम मतदार आपला मतदानाचा नैतिक अधिकार योग्य बाजूने देत असेल व यांनी तिला जर कोणी वोट जिहाद म्हणत असेल तर त्यांना ते खुशाल म्हणू द्यात आपण सर्वजण या देशावर प्रेम करणारे मुस्लिम बांधव आहोत व आपण आपले कर्तव्य देश हितासाठी पार पाडू यात असे आवाहनही आझम पानसरे यांनी यावेळी केले.
या मेळाव्यास माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मौलाना फैज अहमद फैजी, मौलाना सय्यद नुरी, मौलाना गफार, मुनाफ तराजगर, निहाल पानसरे, झिशान सय्यद, रमजान अत्तार, गुलाम अली भालदार, इमरान बिजापूरे, आरिफ शेख, शहीद सय्यद, पापा सय्यद, असिफ सय्यद, मुन्ना शेख आदी मान्यवरांसह शेकडो मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.
