61
पिंपरी
शिवसेनेतील पक्ष प्रवेशाचा ओघ सुरूच आहे. पिंपरी- चिंचवड मधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला.
थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना महिला उपनेत्या सुलभाताई उबाळे, युवासेना पुणे जिल्हा समन्वय सागर पाचरणे यावेळी उपस्थित होते.
गंगाबाई हवालदार,अश्विनी सोपान पुनावडे, शुभम कदम , रोहित चिलवंत, सूरज भोईर, सागर दसवते, सौरभ गावडे, पियुष राजगुडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले.
खासदार बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. मुंबई पासून सर्वत्र शिवसेनेत प्रवेशाचा ओघ सुरू आहे. हे शिंदे यांच्या नेतृत्वाचे यश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे.
Please follow and like us:
