Home पुणे स्किल टेक साई सर्व्हिस फाऊंडेशनस

स्किल टेक साई सर्व्हिस फाऊंडेशनस

‘SaiSTA’ कौशल्य विकास प्रबोधिनीची स्थापना

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 पुणे

  पुण्यातील स्कील टेक साई सर्व्हिस फौंडेशन आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदपुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार होऊन,  संस्थेचे श्री नामदेवराव सूर्यवंशी आय.टी.आय मधील  सुविधा व प्रशिक्षण दर्जा वाढ करण्यात येत आहे तसेच SaiSTA नावाने कौशल्य विकास प्रबोधिनी सुरू करण्यात येत आहे. तसा सामंजस्य करार अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदपुणे आणि स्कील टेक साई सर्व्हिस फौंडेशन यांच्यात नुकताच करण्यात आला अशी माहिती स्कील टेक साई सर्व्हिस फौंडेशनच्या संचालिका मालती कलमाडी यांनी दिली.

  वाहनसेवा उद्योग क्षेत्रातील विविध ५ अल्प मुदतीचे अभ्यासक्रम यामध्ये सुरू करण्यात येत आहेत. ऑटोमोटिव्ह टेलिकॉलरऑटोमोटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्हफोर व्हिलर टेक्शनियनऑटोमोटिव्ह सर्विस एडव्हाईजर आणि लाइट मोटर वाहनचालक,  असे कोर्सेस सुरु होत आहेत. या कोर्सेसच्या माध्यमातून आधुनिक सुविधा युक्त उच्च गुणवत्तेचे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे प्रशिक्षण याद्वारे दिले जाणार आहे.

  नुकताच आय टीआय व SaiSTA यांचे संयुक्त विद्यमाने “वाहन उद्योग क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षण” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात पुणे शहरपरिसर व जिल्ह्यातून विविध खाजगी आयटीआयएमसीव्हिसी व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्यव्याख्याते तसेच व्यवस्थापन यांचे ६० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणुन उदय सूर्यवंशी , जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, SaiSTA संचालिका ,संस्थापिका मालती कलमाडी,  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणपुणे विभागाचे माजी सहसंचालक राजेंद्र घुमेसाई सर्व्हिसच्या सिनियर एच आर संध्या साधले,  अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजेंद्र कोळी,  Sai STAच्या प्रकल्प संचालिका लक्ष्मी गांधी,  श्री नामदेवराव सुर्यवंशी ITI चे प्राचार्य विश्वास सावंतआदि. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00