Home पिंपरी चिंचवड क्लायमेट बजेट मार्गदर्शक पुस्तिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रकाशन

क्लायमेट बजेट मार्गदर्शक पुस्तिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रकाशन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी 

महापालिकेच्या वतीने वार्षिक अर्थसंकल्पासोबतच  पर्यावरणीय अर्थसंकल्प (क्लायमेट बजेट) प्रसिद्ध केले जाणार असून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्लायमेट बजेट तयार करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली असून. या पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या प्रकाशन कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, नगररचना उप संचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्यासह मुख्य अभियंता, सह शहर अभियंता, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०२५-२६ पासून नियमित अर्थसंकल्पासोबत पर्यावरणीय अर्थसंकल्प प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष पर्यावरणीय अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेली मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली असून या पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पार पडले आहे.

या पुस्तकात हवामान आणि हवामान बदल,  आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदलासाठी निश्चित करण्यात आलेली धोरणे आणि दृष्टीकोन, पर्यावरणीय अर्थसंकल्पाची गरज, नियमित अर्थसंकल्प आणि पर्यावरणीय अर्थसंकल्प तुलना,  पर्यावरणीय अर्थसंकल्प म्हणजे काय?, महापालिकेसाठी पर्यावरणीय  अर्थसंकल्प, महापालिकेच्या पर्यावरणीय अर्थसंकल्पाची क्रमवार प्रक्रिया, पर्यावरणीय अर्थसंकल्पातील मर्यादा आणि जोखीम, पर्यावरणीय अर्थसंकल्पाचे चांगले परिणाम- निष्पत्ती आदीबाबत सविस्तर माहिती या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडच्या हवामान अर्थसंकल्पाच्या चौकटीने चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे:

१. अंगभूत पर्यावरण आणि ऊर्जा: हरित इमारती आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांद्वारे  पारंपारिक ऊर्जेचा वापर कमी करणे.

२. वाहतूक: इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि सार्वजनिक परिवहन यासारख्या ठिकाणी हरित- स्वच्छ-ऊर्जा वाहतूक प्रणालींना प्रोत्साहन देणे.

३. घनकचरा व्यवस्थापन: कचरा-ते-ऊर्जा प्रकल्पांद्वारे कचरा पुनर्वापरात सुधारणा करणे आणि लँडफिलचा वापर कमी करणे.

४. पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन: पावसाचे पाणी साठवण, सांडपाणी पुनर्वापर आणि पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन याद्वारे शहरातील पाण्याचे व्यवस्थापन करणे.

हवामान अंदाजपत्रक फ्रेमवर्क मुळे शहरात खर्च केलेला प्रत्येक रुपया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामानातील लवचिकता मजबूत करण्यासाठी योगदान देईल. यामुळे पिंपरी चिंचवडला ओस्लो, लंडन, न्यूयॉर्क आणि मुंबई सारख्या जागतिक शहरांच्या पंक्तीत आणले जाणार  आहे, ज्यांनी वाढत्या हवामान संकटाचा सामना करण्यासाठी समान आराखडा स्वीकारला आहे.

शेखर सिंह (आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00