Home पिंपरी चिंचवड शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार अधिक व्हावा

शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार अधिक व्हावा

संगीतकार विद्याधरन यांना राजहंस पुरस्कार प्रदान

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी

निगडी येथील चिंचवड मळ्याळी समाजमच्या वतीने आकुर्डीच्या केरला भवन येथे ओणमचा सण उत्साहात साजरा कारण्यात आला.

यावेळी मळ्याळी संगीतकार विद्याधरण मास्टर, अभिनेत्री अंबिका मोहन सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर,खजिनदार पी. अजयकुमार,उपाध्यक्ष पी श्रीनिवासन, जॉय जोसेफ, कलामंदिर अध्यक्ष पी.व्ही भास्करन, सहसचिव पी.सी विजयकुमार,फॅन्सी विजयन,कला वेदी संयोजक जी करुणाकरन,सह खजिनदार व्ही.के रामकृष्णन,महिला विभाग प्रमुख प्रविजा विनीत आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी सीएमएस राजहंस पुरस्कार विद्याधरन मास्टर यांना प्रदान करण्यात आला.रोख रक्कम ५० हजार स्मृतीचिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी राष्ट्रीय खेळाडू निष्का नायर, ज्येष्ठ सदस्य रामकृष्ण पन्नीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संगीतकार विद्याधरन म्हणाले कि, शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. हे कार्य सीएमएस विद्यार्थी आपल्या कलेतून करतील.
केरळच्या बाहेर ओणमचा सण मोठ्या उत्साहात सर्व जाती धर्म एकत्रित येऊन साजरा करतात. केरळमध्ये उत्सहा कमी झाल्याचे पहायला मिळते. मात्र केरळबाहेर मळ्याळी बांधव  जिद्दीने काम करीत आहे. आपली संस्कृतीचा प्रसार करीत आहे. त्यांनी सिनेमांत गाणी गायली. दिग्गज कलाकारां सोबतच्या रोचक घटना यावेळी सांगितल्या. यावेळी केरळ मधील भूसखलन पूर्वीचे वायनाड-  आताचे वायनाड यांचे चित्र नृत्यातून कलाकारांनी रसिकांसमोर सादर केले.
कार्यक्रमाचे समन्वयक व्ही.के रामकृष्णन यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन लता विनोद यांनी केले. पी. अजयकुमार यांनी आभार मानले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00