21
मुंबई
राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे समितीकडे केली आहे.
न्यायमूर्ती शिंदे समितीने आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली त्यावेळी मनोज जरांगे यांनी सातारा आणि हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी शिंदे समितीकडे केली यावेळी या गॅझेटच्या अभ्यासासाठी काही महिने वेळ द्यावा अशी मागणी शिंदे समितीने केली. शिंदे समितीची ही मागणी फेटाळून लावत समिती गेली 13 महिने मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करत असल्याने आपण एक मिनिटाचा ही वेळ देणार नाही शासनाने
उद्यापासूनच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव बाबासाहेब पाटील हे त्यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर पोहोचले होते.
यावेळी मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करणे ऐवजी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली असल्याचे समजते. केवळ मराठवाड्यातील मराठ्यांसाठी मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली असेल तर मनोज जरांगे यांनी आपले पाऊल मागे घेतले असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
दरम्यान राज्यभरातून मराठा समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात आजही मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईत प्रचंड पाऊस असतानाही निर्धाराने मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर तळ ठोकला आहे आज दुसऱ्या दिवशीही या आंदोलनकर्त्यांमुळे मुंबई पूर्णतः जाम झाली होती.
Please follow and like us:
