22
कोलंबिया
कोलंबिया येथे जागतिक युवा ऑलंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत 16 वर्ष वयोगटाच्या आतील गटात पुण्याच्या प्रथमेश साई शेरला याने भारत देशाकरिता सुवर्णपदक पटकवत भारताचे नाव उज्वल केला, या जागतिक युवा ऑलंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत सुमारे 85 देशांचा युवा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता,
प्रथमेश साई शेरला याने अतिशय खडतर परिस्थितीत कष्टाने बुद्धिमत्तेच्या कसोटीच्या जोरावर अनेक पदके प्राप्त केलेले आहेत राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्याची शासनातर्फे जागतिक युवा ऑलंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत निवड करण्यात आली होती, सर्व कोच, शिक्षक, पालक यांनी व शासनाने प्रथमेश वर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत प्रथमेशने पुणे शहर, महाराष्ट्र, भारताचे नाव उज्वल केलेले आहे,
प्रथमेश व त्यांच्या पालकांनी प्रथमेशचे सर्व शिक्षक कोच व सहकारी यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे,
Please follow and like us:
