55
नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यनी काल देशाचा 2015 16 चा वित्तीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. खूप मोठ्या अपेक्षा असलेला हा अर्थसंकल्प देशवासीयांच्या दृष्टीने नक्कीच कौतुकाचा ठरला आहे.
या केंद्रीय अर्थसंकल्पात पिंपरी चिंचवडच्या वाट्याला काय आले हे तपासणे देखील महत्त्वाचे वाटते.
प्रामुख्याने थेटपणे पिंपरी चिंचवडला पुणे मेट्रोच्या माध्यमातून जवळपास 250 कोटी रुपये मिळणार आहेत.
या अर्थसंकल्पामध्ये स्वारगेट व कात्रज या मेट्रोसाठी तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या मेट्रो मार्गासाठी म्हणून 837 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या 4.3 किलोमीटर मार्गासाठी म्हणून 910 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे यापैकी काही खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिका काही खर्च महाराष्ट्र शासन व काही खर्च केंद्र शासन करणार आहे यातील केंद्र सरकारच्या वाट्याचा निधी या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.
स्वारगेट ते कात्रज या 5.4 किलोमीटर अंतराच्या मार्गासाठी 423 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंजूर निधी पैकी जवळपास 580 कोटी रुपये हे केंद्रीय अर्थसंकल्पातील स्वारगेट कात्रज या मार्गावर खर्च केले जाणार आहेत. 

केंद्र सरकारने जायका अंतर्गत मुळा मुठा नदीच्या सुधारण्यासाठी 229 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आजवर या प्रकल्पासाठी 541 कोटी रुपये खर्च झाला आहे 349 कोटी रुपयांचे शासनाचे अनुदान याला प्राप्त झाले असून गेल्या वर्षात 113 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे.
असे असले तरी मात्र इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी कोणतीही तरतूद या प्रकल्पात दिसून येत नाही. इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे सातत्याने ऐरणीवर येत आहे नुकताच इंद्रायणी फेसाळलेली असल्याचा प्रकार जनतेसमोर आला होता त्यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी लक्ष दिले जाईल असे सांगितले होते. पवना व इंद्रायणी या दोन नद्या पिंपरी चिंचवड शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या असून त्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न खूपच बिकट बनू लागला आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांनी सातत्याने इंद्रायणी स्वच्छतेसाठी म्हणून भूमिका पार पाडली आहे यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबविले असे असले तरी केंद्रीय अर्थसंकल्पात मात्र इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी कोणताही निधी नसल्याने नागरिकांच्या थोडेसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी असून येथे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य कुटुंब वास्तव्यात आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्राप्ती करात दिलेल्या सवलतीचा थेट लाभ पिंपरी चिंचवड मधील कामगार वर्गाला मिळणार आहे त्यामुळे कामगार वर्गात अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच बाजारपेठेतील अनेक वस्तू स्वस्त होत असल्याने त्याचाही लाभ पिंपरी चिंचवड मधील कष्टकरी वर्गाला होत आहे.
Please follow and like us:
