58
बौद्ध समाज महासंघाच्या बैठकीत सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा
आकुर्डी
गुंड प्रवृत्तीच्या नेतृत्वाने आजवर समाजाला वेठबिगार आणि गुलाम बनविण्याचे काम केले आहे. यांनी समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी कोणतेही काम आजवर केले नाही त्यामुळे आता सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व निवडण्याची वेळ आली असल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचा निर्णय बुद्ध समाज विकास महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.
मागासवर्गीय समाज हा समस्याग्रस्त राहिला पाहिजे त्याला कधीच पुढे येऊ द्यायचे नाही. समाजातील तरुण मुलांना व्यसनाधीन बनवायचे आणि हा समाज वेठबिगार आणि गुलामासारखा राहिला पाहिजे अशी भूमिका विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आजवर बजावली आहे. आता समाज जागृत झाला आहे. व्यसनाधीन झालेल्या तरुणांना या खाईतून बाहेर काढण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी भूमिका बौद्ध समाज विकास महासंघातील अनेक डॉक्टर, वकील व उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि समाजासाठी अहोरात्र धडपडणारा उमेदवार दिला असून त्या या निवडणुकीत नक्की विजयी होतील असा विश्वास या महासंघाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीचा संयोजक बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस म्हणाले की, महाविकास आघाडीने सुसंस्कृत सुशिक्षित व सक्षम अशा डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या त्या एकमेव उमेदवार आहेत आणि त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाज सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
या बैठकीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, कार्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी, प्रवक्ते मनोज गजभिये, डॉ. किशोर खिलारे, प्रा. नामदेव वाळके, विजय गायकवाड, शरद जाधव, रवींद्र धुळेकर, वसंत साळवी, राजू शीलवंत तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील अनेक डॉक्टर, वकील व उद्योजक उपस्थित होते.
Please follow and like us:
