Home पुणे आयआयईबीएमचे विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत 

आयआयईबीएमचे विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
वाकड
भूमकर चौक येथील आयआयईबीएम कॉलेजमध्ये गेली २५ वर्षांपासूनचे उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी हवेत फुगे सोडून या माजी विद्यार्थी मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना अलिंगन, हस्तादोलन देत जुन्या आठणींना उजाळा दिला.
यावेळी प्रा.डॉ.उत्तराराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईकनिंबाळकर, आय. आय. ई.बी.एम.चे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह,व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह,अरुणा मारवाह,आधीष्ठाता डॉ. पूनम निकम, इंडस चॅम्प स्कुलच्या प्राचार्या प्रा.नम्रता जियानी,संचालक प्रशासन कर्नल रवींद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष मारवाह म्हणाले कि, पंचवीस वर्षाची वाटचाल सहज सोपी नव्हती तर आमच्या साठी आव्हानात्मक होती. आमच्या कॉलेजमध्ये इतर कॉलेजमध्ये हॅलो, गुडमॉर्निंग अशा इंग्रजी शब्द प्रयोग होत नाही तर” जय हिंद” म्हंटले जाते. विद्यार्थ्यांना देश प्रेम आणि सैनिकांप्रमाणे शिस्त लावणे हा हेतू आहे.एक सैन्य कॉलेजसारखी संस्कृती मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करीत आहोत.एव्हढेच नाही तर मारवाह फौंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांना विविध सहकार्य केले जाते.
डॉ. जयसिंग मारवाह म्हणाले कि, गेली २५ वर्षांत सुमारे ५ हजार विद्यार्थी शिकून बाहेर पडले.आमचे विद्यार्थी आज ८ खंडापैकी ७ खंडात विविध उच्च पदावर कार्यरत आहे.
मान्यवारांच्या हस्ते केक कापून कॉलेजचा २५ वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पंजाबी भांगडा, राजस्थानी घुमर,साऊथ इंडियन नृत्य, आणि मराठी गोंधळावर नृत्य सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणले.विद्यार्थ्यांच्या या नृत्याला माजी विद्यार्थ्यांनी टाळ्यांची दाद दिली.
2002 ते 2025 प्रत्येक बॅचेस चे 25 झाडांचे वृक्षारोपणाचा उपक्रम एक आठवण म्हणून राबवण्यात आला.यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम चांदखेड येथे संपन्न झाला.
माजी विद्यार्थ्यांच्या चिमुकल्यासाठी देखील मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे आयोजनासाठी माजी विदयार्थी मृदुल नागपाल, गौरव काबरा, मंदार ठोसर,राकेश कंडारी यांनी पुढाकार घेतला होता.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00