Home पुणे पुण्यात भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा होणार

पुण्यात भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा होणार

गोरगरीब व गरजू उपवर-वधूंनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे 

अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. 15 मार्च २०२५ रोजी बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपति रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित हा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा हिंदू धर्मातील रितीरिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना लाखो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.  गरीब व गरजू उपवर-वधूंनी लवकरात लवकर आपली निःशुल्क नावनोंदणी करावी, असे आवाहन रतनलाल गोयल आणि राजेश अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्यासंदर्भात माहिती देताना रतनलाल गोयल व राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, अग्रवाल समाजाचे कुलदेवता अग्रसेन भगवान यांनीच गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना दिला होता. अग्रसेन भगवान यांच्या याच संदेशाचा सम्मान करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून, आजवर शेकडो गोरगरीब व गरजू जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आलेले आहे. या विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना विविध वस्तू जसेकि कपाट, पलंग, गादी, चादरी, टेबल, पंखा, मिक्सर, देवघर, भांडी, तसेच घरगुती कामाजाच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणार आहेत. याशिवाय वर-वधूचे कपड़े, वधूचे मंगळसूत्र, तोरड्या आणि जोडवेदेखील दिले जातात.

अत्यंत थाटामाटात आणि हिंदू धर्मातील सर्व विधि-परंपरांनुसार दि. 15 मार्च 2025 रोजी गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन येथे आयोजित या विवाह सोहळ्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क असणार नाही. या वर्षीच्या विवाह सोहळ्यात 25 हून अधिक जोडप्यांचा विवाह करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या भव्य-दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी लागणारा सर्व खर्च जसे की वेडिंग हाॅल आणि लाॅन, आकर्षक डेकोरेशन, येणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी रुचकर भोजन वगैरे सर्व खर्च रतनलाल गोयल व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येतो. या विवाह सोहळ्यात लवकरात  लवकर नावनोंदणी करण्यासाठी राजेश अग्रवाल (9049992560) आणि रतनलाल गोयल (9422025049) यांच्याशी संपर्क साधावा.

या सोहळ्यात लग्न करणारी मुले-मुली ही सज्ञान असावी आणि मुला-मुलीची तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही विवाहासाठी संमती असणे गरजेचे आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी अग्रवाल समाजासह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रतनलाल गोयल व राजेश अग्रवाल यांनी दिली.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00