41
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विकास प्रतिष्ठाण बावधन यांच्या वतीने 12 ते 14 एप्रिल दरम्यान विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष स्वराज कांबळे आणि मुख्य आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीचे प्रदेश संघटक उमेश कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
शनिवार दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. भीमस्पंदन हा सांस्कृतिक भीम गीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे. रविवार दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता न्यू होम मिनिस्टर हा सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर यांचा महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांना पैठणी बरोबरच स्कूटी, फ्रीज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, कूलर सह विविध बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. तर 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता एसबीआय बँक एनडीए रोड ते सिद्धार्थ नगर बावधन बुदुक दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास माजी सरपंच वैशाली कांबळे, तुषार दगडे पाटील . निलेश दगडे पाटील, गोविद निकाळजे, स्वप्नील दगडे पाटील, विजय दगडे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून पाषाण, बावधन, कोथरूड या परिसरातील महिलांनी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा असे आवाहन उमेश कांबळे यांनी केले आहे.
Please follow and like us:
