Home पुणे राज्यातील कृषी विद्यापीठांत १२ ‘स्मार्ट कृषी इनोव्हेशन सेंटर’ स्थापन करण्यास मंजुरी

राज्यातील कृषी विद्यापीठांत १२ ‘स्मार्ट कृषी इनोव्हेशन सेंटर’ स्थापन करण्यास मंजुरी

पहिल्या टप्प्यात ६, दुसऱ्या टप्प्यात आणखी ६ केंद्रे सुरू होणार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

“महाराष्ट्र स्मार्ट शेती आणि कृषी नवकल्पनांचा राष्ट्रीय केंद्रबिंदू बनेल आणि ग्रामीण युवांसाठी अ‍ॅग्री-टेक स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन इकोसिस्टम तयार होईल.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे

“राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतात उतरावं आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअर संधी मिळावी, या उद्देशाने CIDSA केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. हे केंद्र म्हणजे स्मार्ट शेतीकडे वाटचाल करणारा महाराष्ट्राचा पाया ठरणार आहे. आजच्या बैठकीत प्रत्येक विदयापीठात ३ याप्रमाणे महाराष्ट्रात एकूण १२ ‘स्मार्ट कृषी इनोव्हेशन सेंटर’ (CIDSA) सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ६ केंद्रे आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ६ केंद्रे सुरू करण्यात येतील तर दुसऱ्या टप्यात ६ केंद्र सुरु करण्यात येणार असून या केंद्रांच्या स्थापनेसाठी कृषी विभाग आणि i value यांच्यात पुढील काही दिवसात करार (MoA) करण्यात येईल. या केंद्रांमार्फत राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान विकास अधिक परिणामकारकपणे राबविण्यात येईल.” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे कृषी विद्यापीठांअंतर्गत CIDSA (Centre for Innovation & Development in Smart Agriculture) केंद्र स्थापन करण्यात यावं यासाठी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल, उपसचिव प्रतिभा पाटील, श्रीकांत आंडगे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “CIDSA प्रकल्पामुळे शेती क्षेत्रात नवकल्पना, अचूकता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. विद्यापीठांच्या माध्यमातून तयार होणारे नवे प्रयोग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि कृषी क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता आणि नफा वाढेल. या केंद्रांच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही गतीमान करावी, तसेच प्रत्येक केंद्र “शेतकऱ्याच्या शेतात संशोधन” या तत्वावर काम करेल याची खात्री करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांचा प्रसार गतीमान होणार असून, महाराष्ट्र स्मार्ट शेती आणि कृषी नवकल्पनांचा राष्ट्रीय केंद्रबिंदू बनेल आणि ग्रामीण युवांसाठी अ‍ॅग्री-टेक स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन इकोसिस्टम तयार होईल.”

CIDSA म्हणजे काय?
Centre for Innovation & Development in Smart Agriculture (CIDSA) ही एक प्रगत संकल्पना आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, संशोधन, डेटा विश्लेषण आणि स्मार्ट शेती उपाय विकसित करून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आहे.

CIDSA केंद्रांचे महत्त्व
कृषी शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, शेतीतील समस्यांवर तंत्रज्ञान आधारित उपाय शोधणे, राज्यातील कृषी डेटा बँक आणि स्मार्ट शेती मॉडेल्स विकसित करणे, ग्रामीण युवांसाठी अ‍ॅग्री-टेक स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करणे आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राची प्रतिस्पर्धात्मकता वाढवण्यासाठी CIDSA केंद्र महत्वाचं ठरणार आहे.

CIDSA केंद्रांद्वारे होणारे फायदे
कृषी क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार गतीमान होईल. IoT, ड्रोन, AI, रिमोट सेंसिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स अशा तंत्रांचा उपयोग करून स्मार्ट शेती विकसित होई. कृषी विद्यापीठे, उद्योग, स्टार्टअप्स आणि शेतकरी यांच्यात समन्वयाचे व्यासपीठ निर्माण होईल. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आधारित निर्णयसहाय्य, प्रशिक्षण आणि नवकल्पना प्रयोगशाळा यांचा लाभ मिळेल. आधुनिक कृषी ज्ञान आणि तांत्रिक कौशल्यांचे संपादन होईल. नफा आणि शाश्वतता वाढविण्यासाठी धोरणांची अंमलबजावणी करण्यास मदत होईल. सध्याच्या आणि भविष्यातील उद्योग गरजा पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि विकास करण्यास सहायता मिळेल. कृषी क्षेत्रात उद्योजकता आणि स्पर्धात्मक फायद्याचा प्रचार केला जाईल. ३.४.१ कृषी ऑटोमेशन लॅब – एए, स्मार्ट प्रिसिजन ॲग्रीकल्चर लॅब, एआर/व्हीआर सर्व्हिसेस लॅबसह कृषी तंत्रज्ञान सोल्युशन्स, कृषी उपकरणे इनोव्हेशन लॅब, शेतीसाठी प्रगत ड्रोन तंत्रज्ञान आणि जिओस्पेशिअल फार्मिंग सोल्युशन्स लॅब अश्या विधिध लॅब्स तयार होतील

 

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00