पुणे
जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुण्याच्या इलेक्ट्रिकल अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या प्राध्यापक डॉ. सारिका खोपे यांना २६ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील कार्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी भारत सरकारकडून विशेष निमंत्रण करण्यात आले आहे. हे निमंत्रण त्यांच्या बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) आणि कॉपीराइट क्षेत्रातील योगदानासाठी करण्यात आली आहे.
डॉ. सारिका खोपे परेडमध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख पाहुण्यांमध्ये असतील, ज्यामध्ये प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर सहभागी होतील. कार्यक्रमानंतर, त्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री, भारत सरकार आणि इतर प्रतिष्ठित अधिकाऱ्यांसोबत एका चहापान कार्यक्रमात सहभागी होतील.
रायसोनी कॉलेज, पुणे येथील कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की, डॉ. खोपे यांची नावीन्यपूर्णता आणि बौद्धिक संपदेप्रती असलेली अढळ वचनबद्धता या कामगिरीतून दिसून येते. त्यांच्या कार्याने रायसोनी कॉलेज पुणेच्या नावीन्यपूर्ण आणि संशोधनात्मक उपक्रमांना प्रेरणा मिळाली आहे.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी आणि रायसोनी कॉलेज, पुणे येथील कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी डॉ. सारिका खोपे यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे
