61
पुणे
जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे येथील संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी पियुष जोशी आणि राजतिलक जोशी यांनी पर्पल जल्लोष सॉल्व्हाथॉन 2025 जिंकून 35,000 रुपयेचे प्रथम पारितोषिक मिळवले. या स्पर्धेत भारतभरातून 100 हून अधिक संघांनी भाग घेतला होता.
विकलांग व्यक्तींसाठी, विशेषतः डिस्लेक्सिया आणि डिमेंशिया असलेल्या लोकांसाठी प्रवेशसुलभता सुधारण्यासाठी केलेल्या त्यांच्या अभिनव उपायाने अनेकाचे लक्ष वेधून घेतले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. रशाकृष्णन, यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण समारंभ मध्ये प्रमाणपत्र रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
रायसोनी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी सांगितले की, पर्पल जल्लोष सॉल्व्हाथॉन 2025 मधील विजय केवळ रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य आणि सर्जनशीलतेला अधोरेखित करत नाही, तर महाविद्यालयाच्या संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन च्या उत्कृष्टतेच्या प्रदर्शन करत आहे.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी आणि रायसोनी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
Please follow and like us:
