7
निगडी
प्राधिकरण येथील सीएमएस सेकंडरी हायस्कुल आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त आयोजित केलेल्या दोन दिवसीय सीएमएस फूड कार्निव्हलचा मुलांनी घेतला आस्वाद.
यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर,खजिनदार पी. अजयकुमार,उपाध्यक्ष पी श्रीनिवासन, जॉय जोसेफ, कलावेदी अध्यक्ष पी.व्ही भास्करन,समन्वयक जी करुणा करण, सहसचिव पी.सी विजयकुमार,फॅन्सी विजयन,सह खजिनदार व्ही.के राम कृष्णन, जी.एस.नायर, टी. व्ही.उम्मन, अनिल परमेश्वरन,प्राचार्या बीजी पिल्ले, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे आदी पालक विद्यार्थी उपस्थित होते.
प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सुमारे तीन विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवला.
या मेळव्यात खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारले होते.
विशेषत: यावेळी पालकांनी स्वतः तयार केलेले अन्नपदार्थ खाद्य महोत्सवात विक्री साठी ठेवले होते.
हरित महाराष्ट्र या उपक्रमाला हातभार लागावा म्हणून शाळेने सुमारे तीन हजार मुलांना औषधी रोपटे भेट देण्यात आले.
काही विद्यार्थ्यांनी गाण्यावर नृत्य करून धम्माल केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालक शिक्षक समितीचे योगेश चव्हाण, यांच्या सह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Please follow and like us:
