पुणे
स्वच्छतोत्सव  निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातर्गत निलायम पूल जनता वसाहत कॅनॉल रोड ते आपला चौक या परिसरात स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली तसेच पथनाट्य, गाणी व घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली.
या वेळी शेल्टर असोसिएट्सच्या सहाय्यक कार्यकारी संचालिका सौ. धनश्री गुरव यांनी (PARMM) प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली व स्वच्छतोत्सव २०२५ चे महत्त्व पटवून सांगितले.
कार्यक्रमास मा. नगरसेविका सौ. प्रिया गदादे-पाटील, स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर श्री.अविनाश निमसे पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. मंगलदास माने,श्री. आशिष सुपनार, आरोग्य निरीक्षक, मुकादम, आणि शेल्टर असोसिएट्सच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. नीलिमा गावडे, टीम लीडर सौ. सुबोधिनी कांबळे, यार्दी संस्था व स्वच्छ संस्थेचे प्रतिनिधी, तसेच सफाई कर्मचारी व स्थानिक नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. 
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शेल्टर असोसिएट्सतर्फे करण्यात आले. स्थानिक नागरिक व महापालिकेचे कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम पुणे महानगरपालिका मलनिःसारण विभाग व NJS-FP सल्लागार संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला.
संदेश :
“स्वच्छता हीच सेवा – चला, एकत्र येऊन स्वच्छ व निरोगी परिसर घडवूया!”
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00