Home पुणे एलिसियम २०२५” या वार्षिक फुड फेस्टीवला उत्स्फुर्त प्रतिसाद

एलिसियम २०२५” या वार्षिक फुड फेस्टीवला उत्स्फुर्त प्रतिसाद

खाद्य संस्कृती व पाक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन.

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे 

महाराष्ट्र राज्य इंस्टीटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये अंतिम वर्ष पदवीतील हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या विद्याशाखेतील विदयार्थ्यांनी स्टार्टअप व ईडी सेल अंतर्गत “एलिसियम” अ मेडिटेरेनियन जर्नी या वार्षिक फुड फेस्टीवलचे यशस्वी आयोजन नुकतेच करण्यात आले होते. खावयानी विविध खाद्य प्रकारचा मनमुराद आस्वाद घेतला. खाद्य संस्कृती व पाक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले होते.

या फुड फेस्टीवला संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक, डीटीई मुंबई डॉ. विनोद मोहितकर, उपाध्यक्ष व सहसंचालक, रिजनल ऑफीस, डीटीई पुणे डॉ. डि. व्ही. जाधव तसेच प्राचार्या डॉ. सीमा झगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

“या कार्यक्रमात २०२१-२०२५ च्या अंतिम वर्षाच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी फेस्टिव्हल यशस्वी करण्यामध्ये परिश्रम घेतले.   यामध्ये ३८ खाद्य प्रकाराचा यात समावेश होता. आंतरराष्ट्रीय पाक कलेचा देखील सहभाग असून १५ प्रकारचे फलाहार तसेच नॉन-अल्कोहोलिक मुलेड वाइन आणि पुदिना आणि तुळशी पेय, बेकरी आणि चॉकलेट पदार्थ समावेश होता.  दोनशेहून अधिक मान्यवरांनी या फेस्टिव्हल चे मूल्यमापन केले. विदयार्थ्यांनी पाक कौशल्य,  कलात्मकता, सजावट, सादरीकरण, अथाति स्वागत, आदी माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले” अशी माहिती  संस्थेच्या प्राचार्या डॉ. सीमा झगडे यांनी दिली.

खावयाचे अनुभव व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाने विदयार्थ्यांनी सहभाग घेणाऱ्याची मने जिंकली.

रेस्टॉरंटच्या अनुभव, फुलांची सजावट, विद्यार्थ्यांचे पोशाख, हाताने रंगवलेले टेबल  आखणी, खाद्यपदार्थची मांडणी मनमोहक होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाला आनंद देणारा एक अप्रतिम अनुभव निर्माण झाला होता असे अनुभव खव्यानी व्यक्त केला. सर्वांनीच विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.

संस्थेचे नामवंत प्राचार्य, संस्थेचे माजी विद्यार्थी आणि प्रायोजक यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शोभा वाढली. सर्जनशीलता, कौशल्य आणि आदरातिथ्य यांचा अविस्मरणीय अनुभवाचा  मेळ घालण्याची विद्यार्थ्यांची क्षमता या कार्यक्रमाने दाखवून दिली.  पाककलेला नवे रूप नवे स्थान देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. हा फेस्टिव्हल ही एक संकल्पना नसून; संस्कृती, पाककृती ला प्रोत्साहन देण्याचा हा उत्सव आहे  तसेच विदयार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट ॲड कॅटरिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रात एक यशस्वी उदयोजक होण्याचे व व्यावसायाचे मार्गदर्शन मिळाले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00