44
हिंजवडी
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आयटीतील फेज-२ मध्ये पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या भागातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाढत्या रहिवासी आणि व्यावसायिक वर्दळीमुळे नागरिकांच्या मदतीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. अॅम्बेसीटेक-झोन कंपनीच्या सहकार्याने हे केंद्र उभारण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १७) सकाळी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, कंपनीचे पदाधिकारी आणि परिसरातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच रहिवासी उपस्थित होते.
Please follow and like us:
