20
पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचे व त्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने काल हॉटेल कलासागर येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ अमोल कोल्हे हे पत्रकारांशी चर्चा करत होते. अमोल कोल्हे पुढे म्हणाले की या विकास आराखड्यात लोकांच्या राहत्या घरावर आरक्षणे टाकले आहेत या शहरातील सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही खासदार किंवा आमदाराच्या जागेवर आरक्षण पडले आहे का? मग केवळ लोकांच्याच घरावर जर आरक्षण पडत असेल तर त्यातून या विकास आराखड्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा दबाव असल्याचे स्पष्ट होते.
अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना सांगितले की पुढील आठवड्यात पिंपरी चिंचवडच्या विकास कामांबाबत पुन्हा एकदा आपण महापालिका आयुक्तांना वेळ मागितले आहे यापूर्वी तीन वेळा वेळ मागितली होती परंतु त्यांनी ती दिली नाही आपण पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह अनेक बाबींबाबत लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
पिंपरी चिंचवड शहरात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात 761 मोठ्या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात आली आहे त्यात किती फ्लॅट आहेत किती लोक राहणार याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही या लोकवस्तीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पाणी रस्ते हे उपलब्ध आहे का हे पाहणे परवानगी देण्यापूर्वी आवश्यक होते मात्र केवळ काही माफी यांना पाठीशी घालण्यासाठी म्हणून सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला जात असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व आपल्या कोणत्याही मागण्या मान्य होत नाहीत याबाबत वस्तूतः श्वेतपत्रिका काढण्याची आवश्यकता आहे व कोणत्या आमदार खासदाराला किती निधी उपलब्ध झाला याची माहिती शासनाने दिली पाहिजे.
पिंपरी चिंचवड शहराच्या प्रश्नांबाबत स्वतः शरदचंद्रजी पवार साहेब हे लक्ष देणार आहेत व हर्षवर्धन पाटील यांना प्रभारी म्हणून नेमले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भोसरीतील छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पुतळ्यासंदर्भात ज्या पद्धतीने राजकारण केले जात आहे ते करू नये असे सांगत जर छत्रपतींच्या संदर्भात कोणी राजकारण केले तर जनता ते हाणून पाडते असा आपला अनुभव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा चालू असल्याचे सांगितल्यावर त्याबाबत उत्तर देताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले की राहुल कलाटे परदेशात असल्यामुळे ते दोन दिवस उपस्थित राहू शकले नाही परंतु ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, सुलक्षणा शीलवंत धर, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, पक्षाचे कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे धम्मराज साळवे जयंत शिंदे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
Please follow and like us:
