Home पुणे सर्व बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

सर्व बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पुणे
जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक डॉ जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक भुषण लगाटे, प्रकल्प संचालक  शालीनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहप्रबांधक बचेंद्रा मलिक, जिल्हा उद्योग केंद्राच्या  महाप्रबंधक वृषाली सोने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले,  जिल्ह्याचा वार्षिक पत पुरवठा मध्ये मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढवण्यात आला. कृषी पत पुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ८७० कोटींची वाढ करण्यात आली तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी २० हजार कोटींची भरघोस  वाढ करण्यात आलेली आहे.
पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाची उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे असून,किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबर २०२४ अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून ११६ टक्के लक्ष गाठले आहे.वार्षिक पिक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड)उद्दिष्टच्या अनुषंगाने बँकांनी आज तह ५ हजार ७४५ कोटी कर्जाचे वाटप करून ९० टक्के लक्ष पुर्ण आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन ही केले.
राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगार योजनेचा आढावा घेत असताना बँकांनी विविध योजनांमध्ये कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी बँक स्तरावर आढावा घेवून नामंजूर झालेल्या प्रकरणांचा अहवाल डिसेंबरअखेर सादर करावा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
श्री लघाटे म्हणाले,  सरकारी योजने अंतर्गत कर्ज वाटप वेळेवर करावे. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँकांनी मेळावे घ्यावेत,  अशा सूचना त्यांनी दिल्या.
श्री. मोहानवी आणि श्री योगेश पाटील यांनी कर्ज मंजुरीबाबत माहिती दिली.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00