Home पुणे हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसकडून जिल्हा परिषद शाळेस डिजिटल स्मार्टबोर्ड

हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसकडून जिल्हा परिषद शाळेस डिजिटल स्मार्टबोर्ड

डॉ.कोल्हे यांच्या हस्ते निरगुडसरमध्ये लोकार्पण 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
आंबेगाव
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसच्या (एचसीसीबी) वतीने निरगुडसरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल क्लासरूमचे उदघाटन खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेजेस कंपनीचे पब्लिक अफेअर्स कम्युनिकेशन्स अँड सस्टनेबिलिटी अधिकारी हिमांशू प्रियदर्शी, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम, वाय डी फोर फौंडेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल निकम,निरगूडसरचे सरपंच रविंद्र वळसे, पूजा वळसे,शाळेच्या मुख्यध्यापिका संगीता शेटे सर्व शिक्षकवृंद ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे, म्हणाले कि “आम्ही आज महाराष्ट्रातील शिक्षण सुधारण्याचा प्रयत्न करत असताना हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस् (एचसीसीबी) सारख्या कंपन्या आपल्या राज्याच्या शैक्षणिक ध्येयांना पाठिंबा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पाहताना प्रेरणादायी वाटते . झेडपीपीएस निरगुडसर येथे डिजिटल स्मार्टबोर्ड्सचे लाँच तंत्रज्ञान पारंपारिक अध्ययन व आधुनिक शैक्षणिक गरजांमधील तफावत दूर करून शैक्षणिक परिपूर्ण उदाहरण आहे. हा उपक्रम सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे, जेथे विद्यार्थी प्रयत्न करण्यासोबत डिजिटल युगामध्ये यशस्वी होऊ शकणार आहे .”
यावेळी कोका कोला कंपनीचे चीफ पब्लिक अफेअर्स, कम्युनिकेशन्स अँड सस्टनेबिलिटी अधिकारी
 हिमांशू प्रियदर्शी म्हणाले कि,हा उपक्रम एचसीसीबीच्या औद्योगिक सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ) कार्यक्रमाचा एक भाग आहे, यातून महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभव अधिक दर्जेदार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत . क्लासरूममध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करत नवीन स्थपित करण्यात आलेल्या स्मार्ट बोर्ड्सचा परस्परसंवादी, सर्वसमावेशक व डायनॅमिक अध्ययन वातावरणाला चालना देण्याचा मानस आहे. डिजिटल स्मार्टबोर्ड्स क्लासरूम अनुभवाचे आधुनिकीकरण करण्यामध्ये आवश्यक साधन म्हणून सेवा देतील, ज्यामुळे शिक्षक अधिक परस्परसंवादी अध्यापन करू शकतील आणि व्हिज्युअल व डिजिटल साधनांच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या संकल्पना आत्मसात करण्याच्या विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढतील.एचसीसीबी सक्रियपणे समुदायासोबत परस्परसंवाद साधत विविध सेवा देत आहे. दिड लाखाहून अधिक व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहे.
 ” यावेळी वायडी फोर फौंडेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल निकम म्हणाले कि, कोका कोलाच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून भारतभरातील समुदायांमध्ये दीर्घकालीन, सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा मानस आहे. एचसीसीबीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीत जल शुद्धीकरणासाठी आरओ मशीन आणि आने गावामध्ये डिजिटल लाँच सुरू करत आहे. जांभोरी गाव, (ता.आंबेगाव) येथे डिजिटल स्मार्टबोर्ड व आरओ फिल्टर मशीन बसवले जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी आणि पुरेशा स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र सातपुते यांनी तर आभार जीवन कोकणे यांनी मानले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00