Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

कार्यक्रमास महिला नगरसदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

समाज विकास विभागाच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात

पिंपरी

  महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला स्वतः सक्षम झाल्यानंतर ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम करीत असते. त्यामुळे आज प्रत्येक महिला सक्षम व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे असून त्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सक्षमपणे कामकाज करीत आहे असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते आणि माजी आमदार अश्विनी जगताप, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी पठारे, डॉ.श्रद्धा रवि लांडगे, प्रिया आण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास नगरसदस्या माई काटे,नीता पाडाळे, कुंदा भिसे,अनिता काटे, प्रतीक्षा लांघी जवळकर, पल्लवी जगताप, रेश्मा भुजबळ, सुलभा उबाळे,सुप्रिया चांदगुडे, रिटा सानप, सारिका बोऱ्हाडे, शिवानी नरळे, प्रियांका कुदळे, योगिता बारणे, निकिता कदम, सारिका मासुळकर, सोनम मोरे, मनीषा लांडे, पल्लवी वाळके, श्रुती वाकडकर, वर्षा जगताप, निकिता कदम, पल्लवी वाल्हेकर, कुंदा भिसे, श्रुती डोळस, वैशाली काळभोर,माजी नगरसदस्या उषा मुंढे,उपायुक्त ममता शिंदे, चेतना केरूरे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला मोठ्या उपस्थित होत्या.

माजी आमदार आश्विनी जगताप म्हणाल्या की, महिलांचा विकास झाला तरच समाजाचा विकास शक्य होईल. प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे, असे सांगतानाच ‘निरोगी रहा, आनंदी रहा, हसत रहा,’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.

महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील बसस्थानके, बाजारपेठा, मंडई, मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी महिला आणि दिव्यांगांसाठी सर्व सुविधायुक्त आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी पठारे यांनी केली. शहरातील महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यामुळे त्यांची होणारी गैरसोय आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. यामुळे महिलांसाठी स्वतंत्र आधुनिक स्वच्छतागृहे उभारणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी केले तसेच संगणकीय सादरीकरणातून समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहितीही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार समाज विकास अधिकारी संतोषी चोरगे यांनी मानले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण.

जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमात शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला बचत गटांचा यावेळी सन्मान देखील करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी गीतगायन तसेच विविध पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले.

सन्मान झालेले बचतगट

निसर्ग महिला बचत गट

महिला बचत गट

स्वामी समर्थ महिला बचत गट

नवक्षितिज महिला बचत गट

गृहिणी महिला बचत गट

अस्तित्व महिला बचत गट

श्री तुळजाभवानी महिला बचत गट

कृष्णा महिला बचत गट

रायगड महिला बचत गट

राजमाता महिला बचत गट

आराध्या महिला बचत गट

दत्तकृपा महिला बचत गट

मैत्री दिव्यांग महिला बचत गट

क्रांतीज्योती महिला बचत गट

विजयालक्ष्मी महिला बचत गट

समिता महिला बचत गट

दिव्यज्योती महिला बचत गट

मेरूशिखर महिला बचत गट

 

सन्मान झालेले बचतगट फेडरेशन

संजीवनी स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

उड्डाण स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित 

आरंभ स्वयंरोजगार महिला सहकारी संस्था मर्यादित

झेप स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

एकता स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

गरुडझेप स्वयंरोजगार महिला सहकारी संस्था मर्यादित

अल्फा स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

 

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00