14
पिंपरी
सावित्रीबाईचे जन्म स्थान असलेले नायगावचे नाव लवकरच सावित्री नगर म्हणून ओळखले जाईल. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चिंचवड येथे दिली.
ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले कि,
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जवळपास 64 मुलं-मुलींचे हॉस्टेल मागील दोन वर्षात सुरू केले,मागच्या तीन वर्षात जवळपास 42 विद्यार्थी महाज्योतीच्या माध्यमातून यूपीएससीची परीक्षा तर तसेच जवळपास 52 विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. याचे मला समाधान आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही प्रस्ताव केला तरी ते कधीही नाही म्हणत नाहीत. कोणतेही विकासाचे काम असले तरी त्यामध्ये आम्ही लक्ष घालून पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो. ते आम्हा नेत्यांना सांगतात की मंत्री पदाच्या माध्यमातून विकास कामे करण्याची आपल्याला खूप चांगली संधी मिळालेली आहे. आणि त्या संधीचा लाभ घेऊन आपण सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे. सगळ्यांशी संपर्क साधून सगळ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. असे गौरवोदगार
महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने समाजात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुरस्कार सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, येथे संपन्न झाला. यावेळी पुरस्कार सोहळ्यास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,विशेष पोलीस महानिरिक्षक सुनील फुलारी, वसंत लोंढे,अपर्णा डोके,संगीता ताम्हाणे…
आदि मान्यवर उपस्थित राहणार होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार-२०२६
सूर्यकांत ज्ञानोबा भसे व मिराताई सूर्यकांत भसे
(फुले दांम्पत्य पुरस्कार २०२६)
देवई वाळुंजकर , हिराबाई भुजबळ
सुभद्रा अर्जुन म्हेत्रे ( तिघेही आदर्श माता),
शकुंतला जगताप ,कविता आल्हाट, वृषाली मरळ,रंजना कुदळे ( सर्व समाज भूषण),
मनिषा सुरेश गोरे (महिला भूषण),
शिल्पा रोडगे (कार्यक्षम शिक्षण अधिकारी)
ज्योत्स्ना भुजबळ, सीमा शिंदे, सुनिता शिंदे,स्मिता बनकर (सर्व आदर्श शिक्षिका),
डॉ ऋतुजा जगताप, हर्षा औटी (कला भूषण),
संगिता टिळेकर (कृषी रत्नभूषण),
डॉ. शुभांगी म्हेत्रे – (रखमाबाई राऊत वैद्यकीय भूषण),
डॉ. दिपाली देशमुख (वैद्यकीय भूषण)
सायरा शिकलगार (फातिमा सावित्री पुरस्कार)
सोनिया राजगिरे (उद्योग भूषण)
मिना माळी (आदर्श सरपंच)
श्रद्धा सावर्डेकर (अध्यात्म भूषण) यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रम आयोजनासाठी मंडळाचे प्रशांत डोके, सुर्यकांत ताम्हाणे,अनिल साळुंके,महादेव भुजबळ, निलेश डोके,नितीन ताजणे, वैजनाथ माळी,विलास शेंडे, नरहरी शेवते,किशोर माळी, निखिल यादव,अजित भोसले, शिवम् बर्के,पोपट ताजणे,प्रदीप दर्शले,अमर ताजणे, अनिता ताठे, उर्मिला भुजबळ,आशा माळी,वृषाली ताजणे,कुंदा यादव, स्मिता माळी,शारदा राऊत, पुजा साळुंके ,हर्षद भुजबळ,श्रीहरी हरळे,प्रकाश गोरे,नवनाथ कुदळे,कौशल माळी,परेश ताम्हाणे,रमेश गायकवाड, अशोक टिळेकर, ओंकार भोसले, दिलीप भोसले, किरण राऊत,सोहम भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
जयकुमार गोरे म्हणाले कि, नायगाव मध्ये कार्यक्रम असताना पहिले मला बोलावलं जात नव्हतं पण आता सुदैवाने सावित्रीबाईचं स्मारक बांधण्याची जबाबदारी आता ज्या जिल्हा परिषदेकडे आहे ते जिल्हा परिषदेचे खाते माझ्याकडे आहे. त्याच सोबत सावता बाबांचं स्मारकही भव्य दिव्य उभं करण्यात येणार आहे. सावता बाबांचे स्मारक बांधण्याची जबाबदारी ही माझ्यावरच आली आहे. भिडे वाड्याचं काम देखील चालू आहे. सावित्री यांचे स्मारक, सावता बाबांचं, भिडे वाडा तसेच ज्योतिबा फुले स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच व्हावं लागेल असे ते म्हणतात. त्यांना मंडळाकडून चिट्टी येते आणि त्यात असे लिहिलेले आहे की नायगावचे नामकरण सावित्री नगर करावे. महात्मा फुले यांचे गावा कटगुणमध्ये असले तरीही तिथे त्यांचे एक पुतळा सोडला तर काहीच नाही. तसेच ते विरोधकांनाही काही कमी पडणार नाही तुम्ही काळजी करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव सगळ्यांना सोबत घेवून जाण्याचा आहे. मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझ्या वडिलांचा किराणा मालाचे दुकान होतं त्यामुळे आमचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता पण मी माझ्या मान -खटाव पासून सुरुवात केली. तिथे एकही गाव असं नव्हतं की जिथे शेताला पाणी नव्हतं. मान,- खटाव तालुक्याचे नाव दुष्काळी तालुका म्हणून घ्यायचे. आज मी त्या तालुक्याने मला चार वेळा आमदार करून दिले कारण मी त्यांना विश्वास दिला की मला आपल्या तालुकाचा दुष्काळी तालुका हा ठसा पुसून टाकायचा आहे. माझ्यामुळे प्रत्येक गावात आज पाणी पोहोचते.
Please follow and like us:
