67
चिखली
महाराष्ट्र हा विकासाच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्राच्या या विकासात पुणे हे ग्रोथ इंजिन आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे भूमिपूजन, देवरे ते उभारण्यात येणाऱ्या पोलीस विश्रामगृहाचे भूमिपूजन, महाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक पोलीस संकुलाचे भूमिपूजन, पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या शिवनेरी सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या तालेरा हॉस्पिटलचे लोकार्पण, शहरातील विविध चौकात उभारण्यात आलेल्या टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ कलाकृतींचे लोकार्पण, स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन उपक्रमाचा शुभारंभ शहरातील अनधिकृत होर्डिंग वर नजर ठेवण्यासाठी ए आय द्वारे तयार करण्यात आलेल्या प्रणालीचा शुभारंभ स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या संगणक प्रणालीचे लोकार्पण आकुर्डी ते सांगवडे पवना नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन, पिंपरी येथे उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे व अग्निशामक प्रबोधिनीचे भूमिपूजन, प्राधिकरणात हेडगेवार भवन जवळ उभारण्यात येणाऱ्या अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन, मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड या २४ मीटर विकास आराखड्यातील रस्ता सिल्व्हर स्पून ते इंदिरा रोड अठरा मीटर विकासाला घाटातील रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणारा वाकड शिवेपर्यंतचा रस्ता यांचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज झाला. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री योगेश कदम, पिंपरी चिंचवड शहरातील आमदार महेशदादा लांडगे शंकरभाऊ जगताप, अमित गोरखे अण्णा बनसोडे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे बापूसाहेब पठारे खेडचे आमदार बाबाजी काळे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील जुन्नर चा आमदार शरद सोनवणे माजी खासदार अमर साबळे पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पी एम पी एल च्या महाव्यवस्थापक दीप्ती मुंडे मुधोळ, पी एम आर डी ए चे आयुक्त योगेश म्हसे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालय हे देशातील सर्वात उत्कृष्ट व अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय उभे राहत आहे अजित पवार यांच्या कल्पनाशक्तीचा हा आराखडा उभारताना उपयोग झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना औद्योगिक क्षेत्रातून ब्लॅकमेलिंगचा तसेच खंडणीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत असल्याचे सांगितले उद्योजकांना त्रास देणारे हे लोक कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्याशी कसलीही तडजोड न करता कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या पुणे शहर महाराष्ट्राचे औद्योगिक राजधानी असून अनेक गुंतवणूकदार येथे उद्योग उभारण्यासाठी येत आहेत त्यांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण ठेवले पाहिजे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामाचे कौतुक केले ताथवडे येथील जमीन गृह विभागाला देण्यात आलेली आहे परंतु त्यांना एवढी जमीन लागणार नसून उर्वरित जमीन पिंपरी चिंचवड महापालिकेला विविध विकास कामांसाठी देण्यात येईल त्यासाठी लवकरच मीटिंग बोलवण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले
पुरंदर विमानतळाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की या विमानतळामुळे पुण्याच्या विकास चार पटीने वाढणार आहे पुणे शहर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मान्यता मिळवण्यासाठी या विमानतळाची गरज असून या लागणाऱ्या जागेचे लवकरच भूसंपादन करण्यात येणार आहे त्यात कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले हे विमानतळ एअरपोर्ट व लॉजिस्टिक पार्क असे दुहेरी असल्याने या विमानतळामुळे आयात निर्यातीला चालना मिळणार आहे व तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Please follow and like us:
