Home ताज्या घडामोडी संगमेश्वरमध्ये ‘निकम’ ब्रँडची जादू; धामापूर गटात सुशिल भायजे, तर आरवली गणात प्रिया सुवरे विजयी

संगमेश्वरमध्ये ‘निकम’ ब्रँडची जादू; धामापूर गटात सुशिल भायजे, तर आरवली गणात प्रिया सुवरे विजयी

आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; विजय अजितदादांना समर्पित

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
संगमेश्वर
रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटातून सुशिल बबन भायजे आणि आरवली पंचायत समिती गणातून प्रिया सुवरे यांनी दणदणीत विजय मिळवून विरोधकांचे आव्हान मोडीत काढले आहे.
    निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. सुशिल बबन भायजे यांनी ३,१०६ मतांचे प्रचंड मताधिक्य (लीड) घेत विजय मिळवला तर प्रिया सुवरे यांनी १,२१३ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले.
    या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून आमदार शेखर निकम यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे आणि जनसंपर्कामुळे दोन्ही उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. विजयानंतर बोलताना आमदार निकम यांनी हा विजय पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि विकासाच्या राजकारणाचा असल्याचा विश्वास व्यक्त केला.
आमदार शेखर निकम यांनी या विजयाचा आनंद व्यक्त करताना हा विजय अजितदादा पवार यांना समर्पित केला. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच, मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
    निकाल जाहीर होताच संगमेश्वर आणि आरवली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. “हा विजय आमचा नसून आमदार शेखर निकम यांनी केलेल्या विकासकामांचा आणि जनतेचा आहे,” अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांनी विजयानंतर दिली. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीत नवनिर्वाचित प्रतिनिधींची मिरवणूक काढण्यात आली.
या विजयामुळे आगामी काळात संगमेश्वर तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00