Home पिंपरी चिंचवड ड्रीम्ज स्केटिंग क्लबच्या ४ खेळाडूंचा  विश्वविक्रम 

ड्रीम्ज स्केटिंग क्लबच्या ४ खेळाडूंचा  विश्वविक्रम 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
बेळगांव( कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या फास्टेस्ट १००मी ऑन रोलर स्केटिंग यूसिंग टू व्हील्स ५३ तास , अटेम्प्ट फॉर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम महोत्सवात पिंपळे सौदागरच्या नाना काटे सोशल फाउंडेशन संचलित ड्रीम्ज स्केटिंग क्लब व एआयएस ड्रीम्झ वाकड ताथवडे ४ स्केटींग येथील खेळाडूंनी रेकॉर्ड ॲटेम्ट पूर्ण करून विश्वाविक्रम नोंदवला.
कोयल संजय गायकवाड,स्वप्नील संतोष सरवदे,अदिती विशाल घोंगडे ( तिघेही आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर),सुखदा संतोष शेटे (विद्या विनय निकेतन , विशाल नगर) अशी विक्रम करणाऱ्या खेळाडूंची नावे आहेत.
   रेकॉर्ड अटेम्प्ट चालू असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तरीही खेळाडूंनी सलग दिवस रात्र ५३ तास स्केटिंग करून हा रेकॉर्ड अटेंम्ट यशस्वीपणे पूर्ण केला, या रेकॉर्डसाठी संपूर्ण देशभरातील सुमारे तीनशे खेळाडू सहभागी झाले होते.
 या खेळाडूंनी आपल्या खेळाची चमक दाखवून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड अटेंम्ट यशस्वीपणे पूर्ण होताच नाना काटे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नाना काटे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
  हे सर्व स्केटर्स पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल स्केटिंग ट्रॅक पिंपळे सौदागर व वाकड ताथवडे येथील अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ड्रीम्झ स्केटिंग क्लब रिंग येथे सराव करतात.
सर्व स्पर्धकांना क्लबचे प्रशिक्षक वैभव बिळगी, राहुल बिळगी, सुरज दीक्षित वंदना बिळगी यांचे मार्गदर्शन लाभले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00